खजूर+अंजीर बर्फी किंवा लाडू

साहित्यः

- खजूर ५०० ग्रॅम (सुपर मार्केट मध्ये बिया काढलेल्या असलेलं पॅक घेतले होते)
- अंजीर २०० ग्रॅम (ताजे फळं नाही, ड्राय फिग चे पॅक)
- सुका मेवा - काजू, बदाम, पिस्ता प्रत्येकी मुठभर (तसे अंदाजे पंचे)
- ओट्स एक छोटी वाटी
- राजगिरा ( ऑप्शनल, पण मी टाकला होता)
- डेसिकेटेट कोकोनट

कृती
- काजू, बदाम, पिस्ता हे कढई मध्ये रोस्ट करून घ्यावे आणि थंड झाल्या वर मिक्सर मधून ओबड धोबड वाटून घ्यावे. ( १-२ दा च घुर्र)
- ओट्स ही थोडेसे रोस्ट करून (हाताला गरम लागतील तितकेच) आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून १-२ दा च घुर्र
- खजुराच्या बिया काढून, त्याचे छोटे छोटे तुकडे करून कढई मध्ये मंद आचेवर परतायला घ्यावेत . ह्या साठी खजूर खरतर मिक्सर मधून ही काढू शकता
- आता त्यातच अंजीर चे छोटे छोटे तुकडे करून मिक्स करावे व छान परतून घ्यावेत
- ह्या मिश्रणाला थोडा ओलसर पणा यायला लागेल
- त्यात सुकामेवा, ओट्स, राजगिरा, डेसिकेटेट कोकोनट हे सगळे मिक्स करून हलवावे
- हे मिश्रण घट्ट आणि एकजिव होत आले की गॅस बंद करून एका ताटात पसरून त्याच्या वड्या पाडाव्यात किंवा लाडू वळावेत

टिपा- खजूर आणि अंजीर चे प्रमाण आणि इतर घटकांचे प्रमाण ही तुमच्या आवडी प्रमाणे कमी जास्त घेऊ शकता.
मी अंदाजे घेतले होते सगळे साहित्य.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle