या आठवड्यात स्टॉकहोम, स्वीडन येथे २०१९ च्या नोबेल पुरस्कारांचा वितरण सोहळा आहे. यावर्षीचा ६ डिसेंबर ते ११ डिसेंबर हा आठवडा 'नोबेल वीक' म्हणून साजरा होणार आहे.
४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली मैत्रीणवर सुरू केलेल्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष! या उपक्रमाअंतर्गत दर वर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची आणि त्यांच्या कामाची ओळख, मराठीतून, सगळ्यांना समजेल अशा संक्षिप्त स्वरूपात करून देण्याचा आपण प्रयत्न करतो.
या वर्षीचे नोबेल पुरस्कार विजेते:
- भौतिकशास्त्राचे नोबेल : James Peebles (जेम्स पीबल्स) आणि Michel Mayor (मायकेल मेयर) व Didier Queloz (डिडियर केलॉझ)
- रसायनशास्त्राचे नोबेल : John Goodenough (जॉन बी गुडइनफ), M. Stanley Whittingham (एम स्टॅनली विटिंगहॅम) व Akira Yoshino (अकिरा योशिनो)
- वैद्यकशास्त्राचे नोबल : William G. Kaelin Jr, Sir Peter J. Ratcliffe, Gregg L. Semenza
- साहित्यातील २०१८ चे नोबेल : Olga Tokarczuk
- साहित्यातील २०१९ चे नोबेल : Peter Handke
- शांततेसाठीचा नोबेल : Abiy Ahmed Ali
- अर्थशास्त्रातील नोबेल : Abhijit Banerjee, Esther Duflo, Michael Kremer
मागच्या वर्षी शांततेचा पुरस्कार जाहिर न केल्यामुळे यावर्षी २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षीचे शांततेचे पुरस्कार जाहिर केले गेले आहेत.