भौतिकशास्त्रातील २०१९ चा नोबेल पुरस्कार

लेखिका - धारा

nobel_2019_physics.jpg
(चित्र सौजन्य : आंतरजालाहून साभार)

जेम्स पीबल्स, मायकेल मेयर आणि डिडियर क्वेलोझ यांना “विश्वाची उत्क्रांती आणि ब्रम्हांडातील पृथ्वीचे स्थान समजून घेण्यामध्ये दिलेल्या योगदानाकरिता” २०१९च्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषकाने सन्मानित केले आहे.

एकूण पारितोषिकापैकी अर्ध्या भागाचे मानकरी असणारे पीबल्स यांना फिजिकल कॉस्मोलॉजी म्हणजेच भौतिक ब्रम्हांडविज्ञानात त्यांनी विश्वातील कृष्ण घटकांना(dark matter and dark energy) प्रवाहात आणण्यासाठी सैद्धांतिक साधने विकसित केली. त्यांच्या,या क्षेत्रातील सैद्धांतिक कार्यामुळेच ब्रम्हांडविज्ञान हे एक विज्ञान म्हणून उत्क्रांत झाले, प्रगल्भ होत आहे.

नोबेल पुरस्कारातील उरलेला अर्धा भाग मायकेल मेयर आणि डिडियर क्वेलोझ यांना आपल्या आकाशगंगेतील सूर्यासारख्याच एका ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या शोधाकरिता प्रदान करण्यात आले. त्यांनी शोधलेल्या या सुमारे ५० प्रकाशवर्षे दूर असलेल्या ५१ पेगसी नावाच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहाला ५१ पेगसी बी असे नाव देण्यात आले आहे.

विस्ताराने

नोबेल पारितोषिक भाग १

बिग बॅंग मॉडेल विश्वाचे वर्णन त्याच्या अगदी पहिल्या क्षणापासून करतं, जवळपास १४ अब्ज वर्षांपूर्वी, जेव्हा ते अत्यंत गरम आणि गर्द (dense) होते. तेव्हापासून, विश्वाचा विस्तार होत आहे, आणि ते थंड होत आहे. बिग बॅंगच्या केवळ ४००,००० वर्षांनंतर, विश्व पारदर्शक बनू लागले आणि प्रकाश किरणे अंतराळातून प्रवास करण्यास सक्षम झाली. आजही, ही प्राचीन किरणोत्सर्ग आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यामध्ये विश्वाचे बरेच गूढ रहस्य सामावललेले आहेत. या किरणांच्या सैद्धांतिक साधने आणि गणितांचा उपयोग करून जेम्स पीबल्स यांनी विश्वाच्या सुरुवातीच्या काळापासून घडलेल्या घटनांचे स्पष्टीकरण मांडले आणि नव्या संशोधनात्मक प्रक्रिया शोधल्या.

त्यांच्या संशोधनामुळे आज आपल्या विश्वातील केवळ ५ टक्के सामग्री ज्ञात असून उर्वरित, ९५ टक्के, अज्ञात कॄष्ण घटके आहेत, हे सर्वमान्य झाले आहे.

Cosmic background radiation and the expansion of universe

नोबेल पारितोषिक भाग २

ऑक्टोबर १९९५ मध्ये Michel Mayor आणि Didier Queloz या दोघांनी काही खास साधनांचा वापर करून, डॉप्लर एफेक्ट टेक्निकचा वापर करून आपल्या सुर्यमालेबाहेरचा ग्रह शोधल्याची घोषणा केली. दक्षिण फ्रान्समधील हौट-प्रोव्हन्स वेधशाळेच्या आपल्या सुर्यमालेतल्या गुरूसारख्या ग्रहाला 51 पेगासी बीला पाहिले.

51Pegasi.jpg

त्यांच्या या शोधामुळे अशाच प्रकारच्या शोधांची वाढ झाली. आजवर, आकाशगंगेमध्ये ४०००हून अधिक एक्स्पोलेनेट्स आढळली आहेत आणि असेच शोध सतत लागत आहेत. ह्या ग्रहांवरील जग प्रचंड आश्चर्यकारक आहेत. जसजसे अधिक ग्रह सापडत आहेत, आणि अधिक वेधशाळा अंतरिक्षात तयार केल्या जात आहेत, किंवा पृथ्वीवर सुरु चालू केलेल्या आहेत, खगोलशास्त्रज्ञ माणसाला पडत असलेल्या अनादि प्रश्नांचे उत्तर देण्यास जवळ येत आहेत: या विश्वात आपण एकटे आहोत का?

अजून माहितीसाठी :

  1. Scientific background: Physical cosmology and an exoplanet orbiting a solar-type star
  2. पेगसि ५१ब ची जन्मकथा आणि पृथ्वीशिवाय इतरत्र जीवन आहे का?
  3. Exoplanet विषयी सविस्तर चर्चा करणारा विडियो
  4. Exoplanets and Cosmology वर University of Nottingham च्या Mike Merrifield and Ed Copeland यांची चर्चा
  5. भौतिकशास्त्राचे ११३ वे नोबेल आहे.
  6. James Peebles यांची मुलाखत
  7. Michel Mayor यांची मुलाखत
  8. Didier Queloz यांची मुलाखत
  9. James Peebles यांचे वीकीपीडिया पेज
  10. Michel Mayor यांचे वीकीपीडिया पेज
  11. Didier Queloz यांचे वीकीपीडिया पेज
  12. भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची अधिकृत वेबसाईट
  13. 51 Pegasi b चे वीकीपीडिया पेज
  14. पीबल्स यांच्या नावावर त्यांच्या क्षेत्रातील सगळे मानाचे पुरस्कार आहेत. याशिवाय सन्मानार्थ एका Asteroid चे नाव 18242 Peebles ठेवण्यात आले आहे.

संदर्भ :

  1. http://www.mavipamumbai.org
  2. https://www.nobelprize.org/
  3. https://en.wikipedia.org/wiki/
  4. https://www.theguardian.com/

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle