मेकअप - माझा....तुमचा.... सगळ्यांचा....

मेकअप...
ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण सगळे नेहमीच करत असतो, कळून सवरून किंवा नकळतपणे. तुमच्या लक्षात आलं असेलच की मी फक्त चेहऱ्यावर करण्याच्या मेकअप बद्दल बोलत नाहीये. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या स्वतःलाच मेकअप करत असतो. एखादं लहान मूल शाळेत जाताना स्वतःचा मेकअप करून जातं, अगदी शहाणं गोंडस सगळं ऐकणार आणि तेच लहान मूल घरात अगदी मस्तीखोर असतं अजिबात कोणाचं न ऐकणार. ह्या लहान मुलांनीही शाळेत जाताना स्वतःचा मेकअप केलेला असतो. आपण शाळेत असताना एखाद्या मैत्रिणीशी भांडून तिच्याशी कट्टी घेतलेली असते अगदी कायमची. पण खूप खूप वर्षांनी शाळेच्या एखाद्या गेट-टुगेदरला आपण पुन्हा भेटतो तेव्हा त्या मैत्रिणीला कडकडून मिठी मारतो आणि आपल्या नात्याचा मेकअप करतो. इथल्या बऱ्याच मुलींनी सांगितले की लग्नापूर्वी किंवा आई होण्यापूर्वी त्यांचे स्वभाव खूप अग्रेसिव्ह होता चिडखोर होता, पण आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीने त्यांचा मेकओवर केला.

असाच काहीसा मेकओवर केलाय आमच्या मेकप स्पेशलिस्ट पूर्वीने, शिस्तप्रिय आणि नो-नॉनसेन्स स्वभावाच्या डॉक्टर नीलचा, आमच्या मेकअप चित्रपटात. मी सहलेखन केलेला हा चित्रपट अगदी परवा 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे टीजर, प्रोमो मी इथे वेळोवेळी शेअर केले होते ते तुम्ही पाहिले असतीलच. चित्रपटाची गाणी आणि डायलॉग्ज टीजर सुद्धा मी सोशल मिडियाद्वारे शेअर केले होते. आज ते सगळे मी इथे पुन्हा टाकते आहे म्हणजे कोणी मिस केले असल्यास तुम्हाला ते बघता येतील.

हा माझा पहिला चित्रपट असल्याने मी खूप excited आहे आणि तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी असल्यामुळे ह्या excitement मध्ये मला तुम्हालाही सामील करून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र एका वेळी एके ठिकाणी हा चित्रपट बघता येणार नाही पण तरी तो एकत्र बघण्याची मजा आपल्याला एन्जॉय करता यावी म्हणून हा खटाटोप. आपण चित्रपट बघतो ते एंटरटेनमेंट साठी, मज्जेसाठी, हीच मज्जा आपण एकमेकांबरोबर शेअर करूया.

तुम्ही हा चित्रपट बघायला जाल तेव्हा मेकअपच्या पोस्टर बरोबर तुमचा फोटो काढा आणि इथे कमेंट मध्ये टाका. तुम्हाला पूर्वीने केलेला हा मेकअप कसा वाटला हे वाचायलाही मला आणि इथल्या सगळ्या मैत्रिणींनाही खूप आवडेल. आपल्या काही मैत्रिणी खूप छान गातात, त्यांनी मेकअप मधली गाणी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून इथे टाकली तर अजून मज्जा येईल. आणि ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या मेकअप रिलेटेड काही गमतीशीर घटना शेअर करू शकलात तर अहाहा, बहार येईल ह्या सगळ्या मज्जेला. :)

लागेना
जुळली गाठ गं
धतिंग धिंगाणा
पूर्वी

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle