सध्या येयेजाजामध्ये रोज दोन तास गाडीत जातात. त्या कम्युटमध्ये इतक्या मजामजा किंवा लोकांची मजा आपल्याला सजा टाईप अनुभव येतायत. म्हटले लिहावेत.
माझी घरातून निघायची व परत यायची वेळ प्रचंड फिक्स आहे. त्यामुळे झालेय काय, की इतर असे फिक्स वेळा असणारे कम्युटर्स मला दिसायला लागलेत. आणि ही फारच मजेदार गोष्ट होती. सुरवात झाली ती एक अगदी युनिक कलर असलेली मेटॅलिक निळी सुबरू एका ठिकाणी फ्रीवेला मर्ज होताना मी दोन तीनदा पाहीली. आता ती दिसली नाही की चुकचुकायला होते.
एक वाहिद पाटी असलेली फेरारी रोज माझ्या नंतर लगेच जाॅईन होते. फारच प्रचंड आवाज आहे तिचा. कदाचित बिघडलेली असावी.
बाकी आवाजावरून आठवले. स्पोर्ट्स कार घेऊन २३ किंवा १०१ ला जावं असं कोणाला का वाटत असेल? किती ओव्हरकिल आहे हे. सुंदर दमदार इंजिन, पण २०च्या पुढे काटा जाईल तर शपथ.
मग हे लोकं गुरगुराट करून समोरच्या कारला घाबरवायला किंवा इंटिमिडेट करायला बघतात. एका जीपमधल्या प्राण्याने तर वैतागून (किंवा मजेत who knows!) ट्रॅफिकमध्ये कार जागच्याजागी S आकारात हलवायला सुरवात केली. कोणालाच जागच्याजागी उभं राहण्याखेरीज काही करता येणार नव्हते.
बरेच नमुने कट मारणारे टेलगेट करणारे असतात व ते विरासतच्या डायलाॅगप्रमाणे ‘मेरे अंदर के जानवर को जगा देते है..’ पण कितीही रोड रेज आला अंगात तरी तोंडात मुर्ख बावळट अक्कलशून्य व रिडीक्युलस असे नाॅर्मलच शब्द बाहेर पडतात व तो रेज गपचूप चरफडत निघून जातो आपला. अजूनतरी मी हॅंड जेस्चर व इतर शब्द उच्चरलेले नाहीयेत पण कोणी सांगावं.. प्रॅक्टीस मेक्स बस्के अ सीझन्ड कम्युटर.
सगळेच असे घायकुतीला आलेले नसतात खरे. एके दिवशी माझ्या पुढे काळ्या कन्वर्टीबल बीएमडब्ल्यूत एक विशीचा मुलगा अत्यंत निवांत बसला होता. मी त्या दिवशी वैतागले होते खरं पण त्या मुलाला पाहून रिलॅक्स होत गेले.. खरी मजा तर पुढेच झाली. आमच्या शेजारच्या लेनमधून सेम माॅडेल, काळी convertible bmw आली मी या दोन गाड्या सेम आहेत हे नोटीस करतच होते जेव्हा शेजाऱ्याने माझ्या पुढच्याला हाॅलर केले .. इतके आनंदात.. की अरेऽ सेमच आहेत की कार आपल्या.. what’s up dude! टाईप.. त्या आनंदी interactionनी माझा सगळा स्ट्रेस पळाला आणि त्या दोघंबरोबर मी व माझा शेजारी पण हसायला लागला!
सकाळच्या घाईत कारमध्ये साग्रसंगीत मेकप करणाऱ्या बायकांना मात्र माझा साष्टांग नमस्कार! कसं काय जमवतात कोण जाणे. पण काहीही म्हणा हे दृश्य पाहून सतत मि.बीन्स(किंवा काॅपीकॅट हिरो नंबर वन गोविंदाचा) सीन आठवतो व हसायला येते! त्यांचं पाहून मी लिपग्लाॅस लावण्या पर्यंत मजल मारली आहे. एवढे बास आहे मला पुढे नकोच काही.
काही लोकं साधू संत कॅटॅगरीतले. आपण फास्टेस्ट लेन मध्ये निवांत चाललोयत ह्याचे त्यांना काय सोयर सुतर नसते. पुढे मैलभर रिकामा रस्ता व मागे १५ गाड्या असतील तर चुक तुमची ना भाऊ? जोरात चला किंवा स्लो लेनमध्ये जा... पण नाही..
असेच एक काका आज माझ्या मागे होते. बाकी हा नमुना इतक्या प्रकारे विरोधाभास दाखवणारा होता की बस रे बस.. युज्वली आपण कार माॅडेल-मेक/रंग/सजावट यावरून एक अंदाज बांधतो की ड्रायवर कसा असेल. ते सगळं चुकलं माझं. ही मागची काॅर्वेट शायनी बेबी पिंक कलरची.. मला वाटलं ती कोण एलेतली सेलिब्रिटी ॲक्ट्रेस पिंक काॅर्वेटवाली तीच आहे. तर आत दिसला माणूस. क्रीम वगैरे कलरचा हाफ शर्ट घातलेला काका लिटरली ३०च्या स्पीडने चालवत होता काॅर्वेट. मी कितीही पुढे गेले तरी त्यांना जोरात चालवायचेच नव्हते.
बाकी एक कारला ओव्हरटेक करून ट्रॅफिक जाम मध्ये किंवा रेड सिग्नलला लवकर जाऊन पोचणाऱ्या लोकांना सांगावं वाटतं.. जरा आजूबाजूला पाहा! रोज सनसेट दिसतो जाताना. व्हॅली इतकी देखणी दिसत असते तेव्हा. डोंगर चक्क गुलाबी! आणि मुळात एक कार पुढे जाऊन काय एवढे दिवे लावतो आपण. एक मिनिट वाचला? नाही.. तो तर तसाही जातोच ट्रॅफिकमुळे.. The journey is important. be in the moment. You are going to reach the destination anyway. :) वेल आय नो आय नो .. जास्तच डीप झालं.. पण हे असं ड्रायव्हींग ध्यानच वाटते मला कायम..
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle