देवीचं नवरात्र म्हणजेच स्त्री-शक्तीचा सोहळा! घर-दार-कुटुंब सांभाळणारी स्त्री असू दे, काबाडकष्ट करून लेकरांचं भलं होण्याची स्वप्नं पहाणारी स्त्री असू दे, पुरुषी विश्वात आपली दमदार पावलं आत्मविश्वासानं पुढे टाकणारी स्त्री असू दे अथवा आपल्या व्यवसायाचा भला मोठा पसारा एकहाती सांभाळणारी स्त्री असू दे ..... आपण सगळ्या आहोत त्या स्त्री शक्तीचीच रुपं. त्या आदिमाता शक्तीला वंदन!!!
नवरात्री निमित्त मैत्रिणतर्फे आम्ही तुमच्याकरता विविध उपक्रम घेऊन येत आहोत.
नवरंग
आजकाल सगळ्यांना माहित असलेला आणि सगळ्यांच्या आवडीचा हा उपक्रम. नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ रंग आहेत. त्यांची यादी तुमच्या माहितीसाठी खाली दिली आहे. तुम्ही त्या त्या दिवशी त्या त्या रंगांचे कपडे घालून तुमचे फोटो काढून इथे टाकू शकता. एकटीचा अथवा मैत्रिणींबरोबरचा अथवा घरातल्या सगळ्यांचा असला तरी चालेल.
नवरात्री दिवस १ - ऑक्टोबर १३, (मंगळवार) - लाल
नवरात्री दिवस २ - ऑक्टोबर १४, (बुधवार) - गर्द निळा / रॉयल ब्ल्यु
नवरात्री दिवस ३ - ऑक्टोबर १५, (गुरुवार) - पिवळा
नवरात्री दिवस ४ - ऑक्टोबर १६, (शुक्रवार) - हिरवा
नवरात्री दिवस ५ - ऑक्टोबर १७, (शनिवार) - राखाडी / करडा
नवरात्री दिवस ६ - ऑक्टोबर १८, (रविवार) - नारिंगी
नवरात्री दिवस ७ - ऑक्टोबर १९, (सोमवार) - पांढरा
नवरात्री दिवस ८ - ऑक्टोबर २०, (मंगळवार) - गुलाबी
नवरात्री दिवस ९ - ऑक्टोबर २१, (बुधवार) - आकाशी
******************************************************************************************
नवमैत्रिणी
नवरात्रीच्या रंगात नव्या मैत्रीचा रंग मिसळुयात. मैत्रिणच्या ह्या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असल्यास आपलं नाव इथे नोंदवा.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्या नावांमधुन २-२ जणींच्या जोड्या आम्ही इथे randomly बनवुन देऊ. नवरात्रीच्या नऊ दिवसांत तुम्ही दोघी भेटायचं. प्रत्यक्ष जमल्यास तसं किंवा आंतरजालीय साधनं वापरून एकमेकींशी ओळख करुन घ्या, गप्पा मारा, नवीन मैत्रिणीचे छंद, आवडीनिवडी, करिअर अश्या गोष्टी जाणून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या नवीन मैत्रिणीबद्दल, तुमच्या दोघींच्या भेटीबद्दल आम्हांला सगळ्यांनाही नक्की सांगा..
******************************************************************************************
नवरात्री निमित्त तुम्ही तुमच्या आवडत्या ९ लेखिका, कवयित्री, स्त्री वैज्ञानिक, समाजसेविका वा इतर कोणत्याही क्षेत्रातील स्त्रियांविषयी लिहावं असं आवाहन करत आहोत. नऊ आकड्यांची इतर काही महती लिहायची असेल तरीही स्वागतच आहे.