परवा फेसबुक वरच्या एका ग्रुप वर नानकटाई ची रेसिपी वाचली.
सोप्पी असल्याने लगेच करून पाहिली. घरी सगळ्यांना फार चा आवडली. परत करायचा आदेशही आलाय. म्हटले आपल्या मैत्रिणींसोबत पण शेअर करूयात. रेसिपी खालील प्रमाणे
साहित्य:
३/४ कप मैदा
३/४ कप बेसन
३/४ कप पिठीसाखर
१/२ कप तूप
चिमूठभर सोडा
वेलची पावडर
बदाम, पिस्त्याचे काप सजावटीसाठी
कृती:
प्रथम मैदा, बेसन सोडा आणि पिठीसाखर एकत्र चाळून घेणे.
त्यात वेलची पावडर आणि थोडे थोडे तूप घालत पीठ मळून घेणे.
तोपर्यंत कुकर मध्ये मीठ/वाळू घालून प्रिहिट करून घ्यावा.
ह्या वरच्या पिठाचे चपटे गोळे करून त्यावर बदाम, पिस्त्याचे काप लावायचे. हे गोळे तूप लावलेल्या इडली पात्रात ठेवून कुकर मध्ये मंद आचेवर 20 मिनिटे बेक करायचे.
20 मिनीटांनी कुकर मधून काढल्यावर नानकटाई थंड झाल्यानंतर च इडली पात्रातून काढावी.
एकदम मस्त आणि खुसखुशीत नानकटाई तय्यार आहे. करून बघा आणि सांगा.
पाककृती प्रकार:
ImageUpload:
