एका मैत्रिणीने काही डिझाइन्स पाठवले आणि बुकमार्क्स बनवायला सांगितले. गंमत म्हणून प्रॅक्टिस म्हणून बनवले सुद्धा.
तर हे बुकमार्क्स बघून बहिणीच्या कलीगने ऐन लोकडाऊनमध्ये 15 बुकमार्क्सची ओर्डर दिली. पण त्याला अजून काहीतरी छान वेगळं हवं होतं...
कॉफी (टी) आणि बुक्स हे ऑल टाईम फेवरेट कॉम्बो असल्याने पहिला बुकमार्क बनला. कॉफीमग बुकमार्क चे काही पीसेस बनवल्यावर मलाच काहीतरी नवीन हवं झालं. तेवढ्यात कोणीतरी एक सुंदर गाण्याचा व्हिडीओ पाठवला ज्यात गाणारे दोघे गिटारच्या सोबतिने गाणं म्हणत होते. तसंही म्युझिक न बुक्स हे सुद्धा अनेकांचं फेवरेट कॉम्बो असतंच की...
मग मैत्रिणीच्या बॅले शिकणाऱ्या पुस्तकप्रेमी मुलीसाठी तिसरा बुकमार्क बनला.
(माझं drawing हत्ती काढला तर ते डुक्कर वाटेल इतपतच बरे असल्यामुळे...) पहिल्याच अटेम्प्ट मधून साकारलेल्या बलेरिना मध्ये मी खुश आहे. आता drawing master च्या हाताखाली धडे गिरवायला सुरुवात केली आहे, पुढे खूप मोठा पल्ला आहे, तो गाठेनच
.
.
.
.
.
.
.
.
.
तारेचे नेम टॅग बनवले आहेत मी, एक ईंना च्या जिंजरला दिले होते सिसामध्ये
ह्या टॅगला खाली घुंगरू लावले होते. जिंजरचा हे घातलेला फोटो पाळीव प्राणी धाग्यावर किंवा 2018 च्या सिसा धाग्यावर असेल
हे खालच्या फोटोत आहेत ते टॅग एका मैत्रिणीला बनवून दिले होते, to be used as keychain or bag tag
माझी बहिण आहे निसर्ग प्रेमी त्यातही चंद्रवेडी. तिच्या साठी हे wall hanging बनवलं.