महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांची ओळख करून देण्याच्या साखळीतला हा आहे तिसरा जिल्हा - अमरावती!
आता, अमरावतीला मी कधीच गेले नाही आहे, पण महाराष्ट्रात जसं हे अमरावती गाव आहे तसंच एक अमरावती आंध्र प्रदेशातही आहे, हे पहिल्यापासूनच माहित होतं. (महाराष्ट्रातल्या आपल्या अमरावतीचं इंग्रजी स्पेलिंग Amravati आहे, आणि आंध्रातल्याचं Amaravati!) नागपूरनंतर विदर्भातलं दुसर्या क्रमांकाचं शहर म्हणून 'अमरावती' मानले जाते (की जायचे?), त्यामुळे "वेगळा विदर्भ झाला पाहिजे" चर्चेत माझ्या मनात अमरावतीच विदर्भाची उपराजधानी असायची. (आय नो! कुकातकुका :ड )
महाराष्ट्राच्या नकाशात अमरावती
अमरावती जिल्हा नकाशा
अमरावती जिल्ह्याचा उंचीनुसार नकाशा
अमरावतीच्या इतक्या तोकड्या माहितीवर हा धागा काढते आहे, तेव्हा विदर्भातल्या मैत्रिणींनो, जरा आपआपल्या अमरावती-आठवणींच्या पोतड्या उघडा आणि लिहायला घ्या पाहू. :)
नकाशे साभार :
https://amravati.gov.in/
https://en.wikipedia.org/wiki/Amravati_district