Hello girls !!
विषय : अर्थातच बॅग्जचा वरती लिहीलाय त्याप्रमाणे
स्थळ : लाॅकडाऊनमध्ये कुठे असणार घरीच
वेळ : लाॅकडाऊन
तर त्याचं झालं असं सक्तीची सुट्टी जाहीर झाल्यावर काय करायचं हा प्रश्न होताच, घरातला कुठलाही कोपरा झाडायचा शिल्लक ठेवला नाही, मग काय वेळच वेळ.
मी माझे आणि आईचे ड्रेस घरीच शिवते (नतद्रष्ट टेलरची कृपा दुसरं काय) तर राहिलेले कापडाचे तुकडे बरेच साठले होते, उरलेल्या कापडात बॅग शिवते एरवी, पण बर्याचदा तसेच ठेवले जातात, मग यावेळेला ठरवलं, दिसणार्या प्रत्येक कापडाला टीप मारुन टाकायची, अर्थात तसं काही केलं नाही, बर्यापैकी कापडाच्या बॅग्ज शिवल्या, शिवताना नाजूक आणि फंक्शनलपेक्षा, दणकट आणि रोज वापरता येतील हे पाहिलं.
बाकीही बरेच प्रकार शिवून पाहिले, साधंसोपं सुटसुटीत शिवायला आवडतं मला.
या शिवलेल्या काही बॅग्ज, छोटुशा पर्सेस पण शिवून पाहिल्या. बर्यापैकी आवडल्या आसपास आणि विकल्याही गेल्या.
तर आता लाॅकडाऊनमधल्या टाइमपासचं रुपांतर व्यवसायात करायचा विचार करतेय, सध्यातरी फक्त ग्रोसरी बॅग्जवरच भर आहे. कशा वाटतायत ते सांगा आणि हो काही सजेशन्स असतील तर तीही सांगा.
गर्ल्स, तुम्ही मला 9423319658 या नंबरवर संपर्क करु शकता.