सायकलच्या गोष्टी!

२०२० च्या फेब्रुवारी महिन्यात ही माझ्या कडे आली. एका मैत्रीणीची सायकल , तिला उंच होते म्हणून , माझ्या घरी पोचती झाली . धावणे , चालण्याचे अल्ट्रा एव्हेंट ,ट्रेक्स , जिम , चुकुन्माकून योगा यापलिकडे व्यायामासाठी इतर विचारच केला नव्हता . आता ही राजकन्या आलीच म्हटल्यावर तिला पहिला महिना तर कोपर्‍यात उभ केलं . कोपर्यातली राजकन्या अडगळ वाटून घरच्या ओसिडी मेंबरानी , क्रमाक्रमानी , अस्वस्थता, कुर्कुर, त्रागा दाखवायला सुरवात केली. पुढचा टप्पा गाठायच्या आधी मी राजक्न्येची ( हिच नाव सोफी ठेवलेल तिच्या पहिल्या सखीनी) जरा डाग्डुजी करुन आणली .
शाळेत असताना माझी , नाव कोरलेली ,BSA slr होती. ती अगदी कॉलेजच्या पहिल्या वर्षापर्यंत वापरली. मग जवळपास ३०-३२ वर्ष लोटल्यावर ही आली. ती पण ३*७ गियर वाली. हिच माझ कस जुळायच , असच वाटत राहिल. पहिली ओऴख म्हणून , हिच नाम करण करून टाकल. रेड रायडिंग बडी. आता बडी म्हटल्यावर दोस्ती निभाना आलच ओघानी. दोन चार चकरा जवळपास मारल्या , चार दोन किमी. गियरच तंत्र काही जमेना . २-४ हे काँबिनेशन सेट करून , साध्या सिंगल गियर सारखीच चालवली .
तोवर लॉकडाउन वगैरे रितसर येउन , बडी परत पार्किंग मधी उभी राहिली. पहिल्या लॉकदाउन नंतर मात्र एका सायकल वेड्या ग्रुपाबरोबर जाउन चार शहाणपणाचे धडे घेतले. गियर च तंत्र जमायला लागल. रपेटीचा पल्ला मोठा झाला अन सुरु झाल आमच अफेयर!!
माझ अन रेड रायडिंग बडी उर्फ राम्प्यारीच.

आजवर व्यायामाचा कंताळा , यांत्रीकपणा , जाउन रोजच्या रपेटी एक मस्त एक्स्प्लोरेशन , मेडिटेशन , ट्रेझर हंट , डोक्यातला गुंता सोडवणे कार्यक्रम , नुसतीच बडीबरोबर्ची डेट अस होउ लागल.

बडी , या काळातली , फोटो काढायची मोठ्ठी हौस तिला. जिथे जाइल तिथे फोटो कार्यक्रम व्हायचाच . अन मग तो सायकल वेड्या , ग्रुपावर पोस्ट करण पण !
इथे या धाग्यात मी आमच्या गप्पागोष्टीतले ,डेटस चे कवडसे दाखवत जाइन . सुरवातीला जुने काही , अन मग रोजच्या राइडस चे.

d5f1afbb-d24b-4c90-a498-d74428027d44.jpg

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle