यंदा दिवाळीत सिंगापूरला जायचे ठरवले. कोणत्याहि ट्रव्ह्ल कंपनी बरोबर न जाता आपण आपलीच ट्रीप करायची म्ह्णून मग इंटरनेट वरुन माहिती गोळा करायला सुरवात केली. बर्याचशच्या ट्रव्ह्ल कंपनींच्या itinerary चेक करुन ट्रीप plan केली.
मुलाला ७ नोव्हेंबर ते २० नोव्हें सुट्टी असल्यामुळे , ७ नोव्हे ची Flight ची तीकीटे बुक केली. सिंगापूर मध्ये orchard road shopping करता तर clarke quay, food joints, night life करता famous आहेत. या दोन्ही area तुन Metro व Taxi मिळ्णे सोपे आहे त्यामुळे hotels online book करताना दोन्हीकडे रहाता यावे म्हणुन Marriott Tang plaza, orchard rd., आणि Novotel clarke quay book केले.
सिंगापूर मध्ये बघण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत, त्यातील Jurong Bird park, Singapore zoo, Sentosa Island, Universal Studio, Gardens by the Bay, Marina Bay sands, Singapore hopper city tour, आणि Singapore flyer बघायचे ठरवले. या सर्वांचीं Entry tickets online book केली. online book करताना विवीध offers चा फायदा घेतला, online booking चा अजुन एक फायदा म्ह्णजे बर्याच ठीकाणी e-ticket वरच entry मिळते, या टिकींटांची validity पण १५ दिवस ते ३ महिने असल्यामुळे आपल्या ५ ते ७ दिवसांच्या वास्तव्यात कधी काय बघायचे याची flexibility रहाते. बहूतांशी Attractions चि Mobile app Download केल्यास प्लान करणे सोपे जाते.
ठरल्याप्रमाणे ७ नोव्हें ला निघालो. ८ नोव्हें ला सकाळी सिंगापूरला पोहोचल्यावर Hotel मध्ये चेक-ईन करुन फ्रेश झालो. दूपारी
orchard road वरच्या food joint मध्ये पिझ्झा व पास्ता खाऊन taxi ने Jurong bird park ला गेलो. तिकीटे हातात असल्यामुळे लगेचच Entry मिळाली. अतीशय दाट झाडी, शांत परिसर, आणि स्वागताला Macaw, Penguin, crane मस्त वाटले प्रवासाचा शीण गेला.
ईथे जगभरातुन विवीध पक्षी गोळा करून आणले आहेत व त्यांना साजेसे वातावरण तयार केले आहे. मूलाने आत गेल्यागेल्या Map घेतला व वेगवेगळ्या शो च्या वेळा पण बघीतल्या त्याप्रमाणे पार्क बघायचे ठरवले. सुरवात High flyer show ने केली, यात Hornbill, Macaw, Toucan, flemmingo, pelicans सारख्या पक्षांकडून करामती करून घेतात, बघून थक्क व्हायला होते (फोटो पुढे आहेत). नंतर जरूर बघावा असा Kings of the Skies शो , अजस्त्र गरूड, गिधाडे, घुबड यांचा Hunting show.
lorry loft मध्ये Bird feeding हा देखणा अनुभव आहे. feeding bowl हातात घेतल्यावर आपल्या आंगाखांद्यावर ईतके
पक्षी बसतात खुप मजा येते, त्यांचे नैसर्गिक रंग बघुन आपण हरखून जातो.
मग पार्क मध्ये पाय आणि डोळे थके पर्यंत फीरलो. (पार्क मध्ये फिरण्यासाठि Tram ride चा पर्याय ऊपलब्ध आहे.)
या पार्क मध्येच पक्षांचे Breeding center पण आहे. बरेसचे पक्षी या पार्क मध्येच जन्माला आलेले आहेत त्यामुळे येथील नैसर्गिक वातावरणात ते आनंदि आहेत. बरेचसे दुर्मिळ पक्षी बघुन हॉटेल वर परतलो.
क्रमशः..