पूर्वतयारीचा वेळ:
५ मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पायनॅपलचे छोटे तुकडे-२कप
साखर- १/२ कप
हिरवी मिरची-१,२ आवडिप्रमाणे
कढिपत्ता-४-५ पान
आल -ताज किसुन अर्धा टेबलस्पुन
पन्चफोडण-२-३ टिस्पुन नसेल तर (एकेक चमचा बारिक मोहरी,मेथीदाणे,बडिशेप्,कलोन्जी,जिरे एकत्र करुन त्यातले २-३ टिस्पुन घ्या )
तेल
मिठ ,हळद्,तिखट चविप्रप्रमाणे
क्रमवार पाककृती:
वरदाने बन्गाली पदार्थाचा धागा काढलाय त्यावरुन ही करुन बघितलेली क्रुती आठ्वली,मधे एकदा सापुरी खट्टाचा उल्लेख वाचला होता पण डिटेल पाकक्रुती नव्हती नुसतच पाच फोडण वर पायनॅपल परतलेले होते (ती आयडियाही भारी आहे) मग क्रुती शोधली तर याचे दोनचार वेगवेगळे व्हर्जन सापडले त्यातल्या एका पद्धतिने करुन पाहिला आणी ती टेस्ट आवडली.
पायनॅपल चे बाइट साइझ तुकडे करुन घ्या मी साधारण २ कप घेतले, एका पॅन मधे तेल तापवुन त्यावर पन्चफोडण टाका, आच मध्यम ठेवा फोडणि जळली तर विचित्र कडवट चव येते, त्यावरच ताज किसलेल आल्,एक-दोन मिरच्या उभ्या कापुन,कढिपत्ता ,थोडी हळद टाकुन पायनॅपलचे तुकडे टाकुन परतुन घ्या, झेपेल तस १-२ टिस्पुन तिखट आणी चविप्रमाणे मिठ टाकुन,परत एकदा परतुन झाकण ठेवुन मन्द आचेवर एक वाफ काढा, यात आता अर्ध कप पाणी घालुन पायनॅपल मऊ शिजवुन घ्या, सगल्यात शेवटी अर्धा कप साखर टाकून मध्यम आचेवर जरा घटटसर होईस्तोवर शिजवा.साइड डिश म्हणून आस्वाद घ्या.
१) काही क्रुतीत साखरेएवजी गुळ वापरला आहे पण तो गरम पडतो मला त्यामुळे मी साखरच वापरली तसच ऑन्थेटिकली यात सरसोचे तेल वापरतात पण त्याचा वास मला आवडत नाही त्यामूले मी रोजच्या वापरातले लाइट ऑलीव्ह ऑइल वापरले.
२)पायनॅपल गोड असेल तर साखर /गुळ एक दोन चमचेच घाला,याची चव आन्बट गोड आणी तिखट अशी आली पाहिजे.
३) काहीजण यात चिन्चेचा कोळही घालतात पण मी वापरलेला पायनॅपल आधिच आन्बट होता त्यामूळे मी चिन्च घातली नाही.
किबहुना पायनॅपल आन्बट निघाला म्हणूनच हा खटाटोप केला.
४)ही ओडिसा किवा बन्गाल मधली पाकक्रुती आहे बहुधा किवा दोन्हीकडे करत असावेत नक्की काय ते जाणकार सान्गु शकतिल
पाककृती प्रकार:
ImageUpload:
