साहित्य
2 कप हेवी क्रीम/हेवी व्हिपिंग क्रीम/क्रीम फ्राईश इ
१/२ कप साखर
5 टेबलस्पून लिंबाचा रस
कृती:
एका जाड बूडाच्या भांड्यात क्रीम आणि साखर एकत्र गॅसवर गरम करा. ढवळत रहा. 5 मिनिटे उकळू दे.
भांडे गॅसवरून काढा आणि लिंबाचा रस मिसळा. ऐच्छिक: किसलेली लिंबाची साल किंवा केशर/वेलची मिसळा.
थंड होऊ द्या. चार ग्लास/ आठ वाट्यात सम प्रमाणात घाला. 2 तास फ्रिजमध्ये थंड करा.
अधिक टिपा:
झालं! काही टीपा नाही. सर्वात लहान पाककृती लिहील्याबद्दल सीमंतिनी यांना पुरस्कार देऊ शकता.
माहितीचा स्रोत:
https://food52.com/recipes/3060-lemon-posset आणि https://www.bbcgoodfood.com/recipes/collection/posset-recipes
पाककृती प्रकार:
ImageUpload:
