सध्या मैत्रीणवर वसंत ऋतु फुललाय! त्यात माझीही भर.. ही बागेत सध्या फुललेली फुलं.. वेल, मोस्टली गुलाबच आहेत. बाकीची झडं कॅचप करतायत अजुन, पण गुलाब म्हणजे काय सांगू? बागेचा गुलकंद झालाय अगदी!
हे समोरचे गुलाब माझ्या फार आवडीचे आहे. ऑरेंज कळी, जस्ट उमलताना पिवळे, उमलले की गुलाबी आणि पाकळ्या गळायाच्या आधी पांढर्या असा चमत्कार आहे.. या घरात राहिला आल्यावरच्या पहिल्या वर्षी मी पार वेडी झाले होते पाहिल्यावर..
मागे डावीकडे जायंट बर्ड्स ऑफ पॅरडाईज.. आणि उजवीकडे एक सक्युलंट होते त्याला भला थोरला तुरा आणि त्याला नाजुक पिवळी फुलं आली आहेत. याचे नाव शोधून देते. माझ्या काही लक्षात राहात नाही.. मी एका अॅपवर सगळे फोटो काढून घेते ते अॅप ते झाड ओळखते मग ते मी माझ्या बागेच्या झाडांच्या यादीत अॅड करते.
ही अनारकली आणि अनारफुल.. आय होप यावर्षीतरी अनारफळ येईल!
हे gazania खरे तर आपोआप आले आहे.. आणि वीडसारखे वाढतेय अगदी. सूर्य वर आला की फुल उमलते, आकाशात सूर्य नसला की नाही. कळ्या बंद.. खूप आवडते पण आवरा झालेय आता..
रातराणीला ही अशी टपोरी कळी कसली आहे? कोणाला माहितीय का?
जुईच्या वेलाला कळ्या आल्या आहेत..
To be continued…