क्रिमी मसाला भिंडी/भेंडी

ही पाककृती मी १,२ आठवड्यापूर्वी युट्युबवर पाहिली होती. आवडली म्हणून करुन बघितली.

साहित्य- कोवळी भेंडी लागेल तशी, टोमॅटो भेंडीच्या प्रमाणात, दोन तीन हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर, ८,१० काजू, काश्मिरी लाल तिखट, हळद, तमालपत्र, जिरं, एक छोटा दालचिनीचा तुकडा, धणेजिरे पावडर, गरम मसाला पावडर, फ्रेश क्रिम, मीठ, फोडणीकरता, तळण्याकरता तेल, आणि थोडं बटर.

कृती- भेंडी धुवून पुसून घेतल्यावर एका भेंडीचे देठ आणि खालचं टोक काढून दोन तुकडे करायचे. हे तुकडे शॅलो किंवा डीप फ्राय करायचे कुरकुरीत होतील इतपतच. काजू तासभर आधी भिजत घालावेत आणि त्याची पेस्ट करुन घ्यावी.
कढईत चमचाभर तेल घेवून त्यात हि. मिरच्यांचे तुकडे करुन परतून घेऊन बाजूला ठेवावेत. त्यातच कोथिंबीर परतून घ्यावी आणि मग टोमॅटोचे तुकडे परतून घ्यावेत. टोमॅटो पाणी निघून जाईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत परतायचा आहे. हवंतर परतताना चमचाभर तेल घालावं. परतलेल्या मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरमध्ये घालून पेस्ट करुन घ्यावी.
कढईत तेल आणि चमचाभर बटर घेऊन गरम झाल्यावर जिरं, दालचिनी, तमालपत्र हे परतून घ्यावं. त्यावर धणे जिरं पावडर, काश्मिरी लाल तिखट, किंचीत हळद हे ही परतून घेऊन वर केलेली पेस्टही परतावी. त्यावरच काजूची पेस्टही परतून घेऊन थोडा गरम मसाला, मीठ घालावं. दाटपणा करता थोडं फ्रेश क्रिमही घालावं आणि मग तळलेली भेंडी घालून झाकण घालून जरा वाफ येऊ द्यावी.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle