दाण्यांची आमटी

आई असल्यामुळे चतुर्थीला उपवासाचे काहीतरी करायचे होते, माझा उपास नसला तरी मी म्हणेल ते ती करणार होती. त्यामुळे भगर आणि दाण्याची आमटी ही माझी फर्माईश होती.

आईच्या हातची ही आमटी फार आवडते, म्हणून शेअर करतेय.

साहित्य
एक वाटीभर शेंगदाणे
चमचाभर चिंचेचा कोळ
चमचा भर गूळ
मीठ चवीप्रमाणे
तूप
जिरे
लवंग - २-३
दालचिनी
हिरवी मिरची

कृती
आदल्या दिवशी रात्री किंवा अगदी पहाटे सालासकट कच्चेच दाणे भिजवून ठेवा. कमीत कमी चार तास तरी आधी भिजवायचे.

मग मिक्सर मध्ये याची पेस्ट करून घ्या. सरसरीत व्हायला हवे. एका पातेल्यात / भांड्यात ही पेस्ट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ आणि थोडं पाणी हे सगळं घालून मध्यम आचेवर उकळत ठेवा. एकीकडे कढल्यात तूप गरम करून जिरे, लवंग, हिरवी मिरची आणि दालचिनी घालून फोडणी करा आणि गरमच आमटी वर घाला. पुन्हा एक उकळी आणून गॅस बंद करा.

ही आमटी हळूहळू जास्त मुरते, त्यामुळे तास दोन तास आधी करून मग वेळेवर पुन्हा गरम करून घ्यायची, जास्त छान लागते.
चिंच गूळ प्रमाण किती आंबट गोड आवडतं त्या प्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता.

Screenshot_20220915-144139~2.png

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle