साहित्यः किनो जातीची छोटी संत्री एक ग्लास किंवा मेझरिन्ग कप रस होईल इतकी. ही बारकी संत्री बरी पडतात कारण साल फार
कडवट नसते व बिया नसतात त्यामुळे मिक्सीत रस काढता येतो.
दोन संत्र्यांचा पल्प संत्री सोलुन आत ज्या चंद्रकोरी असतात त्याची पण सालेकाढायची तो हा पल्प.
एक संत्र्याची साले काढून सुरीने त्याच्या आतील पांढरा कडव ट् भाग खरवडून टाकायचा व साल पातळ राहील त्याचे लांब बारीक एक दीड इंची तुकडे करायचे.
जितका रस तितकी व्हाइट शुगर - पांढरी साखर दाणेदार. पिठी नव्हे.
ठेवायला चांगली स्वच्च्छ धुतलेली काचेची बरणी. झाकण एअर टाइट हवे. किंवा टपर वेअर चा डबा पूर्ण कोरडा.
अर्ध्या लिंबाचा रस.
कृती: संत्री सोलून रस काढून घ्या. व गाळून घ्या. बिया कचरा नाही पाहिजे. त्यात पल्प अॅड करा व संत्री सालीचे लांबट बारीक तुकडे
त्यात मिसळून घ्या. हे सर्व एका जाड बुडाच्या पातेल्यात ठेवा व त्यात मापाने रसा इतकीच साखर घाला. लिंबाचा रस असल्यास घाला
माझ्याकडे लिंबे नव्हते म्हणून मी रस घातला नाही. अर्धा तास तसेच राहुद्या.
मग मंद गॅसवर ठेवून साखरे चा एक व दोन तारी दरम्यान पाक होई परेन्त हलवत राहा. खाली लागू शकते.
झाले की गार होउद्या मग बरणीत भरून ठेवा.
ऑरेंज मार्मलेड सँडविच मला फार आवडते( क्वीन व पॅडिंग्टन लव्ह)
ह्याची कृती व्हाइट ब्रेड टोस्ट करणे वरुन अमुल बटर/ व्हाइट बटर व मार्मलेड चोपड णे व खाणे. पर्स मध्ये नेहमी असू द्यावे. फॉर लेटर.