ही देवी-स्तवन रागमाला मला गेल्या नवरात्रीत कोणीतरी पाठवली आणि पहिल्यांदाच ऐकून मी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यानंतर असंख्य वेळा मी या गाण्याची पारायणं केली आहेत. आणि प्रत्येक वेळी पवित्र अशी अनुभूती मनावर गारूड करते. मन शांत करून टाकणारा दैवी अनुभव मला जाणवत जातो.
From the description from below the youtube video:
An ode to the three Goddesses – Durga, Saraswati & Mahalakshmi; composed in a medley of 24 Hindustani Classical Ragas,
has each line of the song composed in a different Raga, and has the names of the Ragas subtly embedded in the lyrics. Each verse of the song presents different aspects of Devi.
ही रागमाला ऐकणं हे जितकं कर्णमधुर आहे, तितकाच तो नेत्रसुखद अनुभव आहे.साक्षात देवी सरस्वतीसारखी शुभ्र , elegant साडी, पार्श्वभूमीवर योग्य मेळ साधून दिसणारी देवी सरस्वतीची वीणा किंवा साडीतल्या हलक्या सोनेरी जरीला complimenting सोनेरी पडदे - सारंच नेत्रसुखद!
प्रत्येक दोन कडव्यांमधील संगीत, त्यातील वाद्यांचा वापर, पार्श्वभूमीवरील माता कालीचं चित्र, देवीची शब्दांत मांडलेली स्तुती..सगळंच इतकं देखणं आणि कर्णमधुर!! परत परत त्या आनंदात डुबत रहावं असं!
(गाण्यातल्या प्रत्येक ओळीतले राग खाली लिहून येत असले तरी या संगीततुकड्यांमधे कोणते राग आहेत हे मात्र लिहून येत नाहीत. ते कुणाला माहित असल्यास जरूर सांगावेत.)
The raag-mala is brilliantly composed and lyricized by Saurabh Savoor . प्रत्येक ओळीला बदलणारा राग आणि त्या ओळीत देवीचं स्तुतीवर्णन करताना गुंफलेलं त्या-त्या रागाचं नावं - ही कल्पना इतकी अद्भूत आहे!! Hats off to Saurabh..केवळ महान कलाकृती!
Sawani Shende हिच्या performance, appearance आणि rendition बद्दल तर काय बोलावं! शब्दच नाहीत. केवळ अवर्णनीय अनुभूती!
बासरी, सितार, संतूर, सारंगी, तबला या सर्व वाद्यांचा वापरही अप्रतिम..सर्व वादक आणि रेकॉर्डिंग टीमचंही प्रचंड कौतुक! (Youtube व्हिडीओखाली सर्व टीमची नावे आहेत.)
रागमाला ऐकताना you can't resist to go on a journey of exploring the raags used in the medley. ओळखीचे आणि काही अनोळखी राग शोधून ते (अधिक) जाणून घेणे,त्या रागांचे performances youtube बघणे, त्यांवर आधारित गाणी शोधणे - अश्या अद्भुत सुरेल मैफिलींमध्ये मी रंगून जाते आहे.
तर अश्या या अपूर्व कलारचनेचा लाभ तुम्ही सर्वांनी पण घ्यावा म्हणून हा रसास्वाद प्रपंच!