दिवसभर एकमेकांची अखंड सोबत
चंचल आहेत दोघेही पण जमलेलं आहे त्यांचं गणित..
कधी उधाणून, आनंदाच्या गर्जना करत फेसाळणारा तर कधी निशब्द हलक्या तरंगानी माया दाखवणारा एक
आणि कधी तापवून अक्षरशः गुदमरुन टाकणारा तर कधी थापटण्याहून हलकी वाटावी अशी ऊब देणारा दुसरा.. पण त्यांचंते समजून घेतात एकमेकांना.. उमजून चालतात..
कधी कधी मात्र निरोपाच्यावेळी असा नेमका संदेहाचाढग येतो मध्ये..निरोपाशिवायच दिवस संपतो..सकाळची प्रतीक्षा रात्रीला नको तेवढी लांबवते आणि त्या सगळयात एकमेकांच्या साथीचीओढ मात्रा अजूनच घट्ट झालेलीअसते.. त्या ढगाच्याही नकळत.. खऱ्या अंतरीच्या नात्यांचंही असंच होतं..
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle