नुकतीच मेक्सिको (मेहिको) ची ट्रिप करुन आलो. अतिशय सुंदर अनुभव होता. उद्या डीटेल्स लिहीन. सध्या फक्त फोटो टाकते.
रिझोल्यूशन खूप कमी केल्याने फोटोंचा इफेक्ट म्हणावा तसा येत नाहीये. पण सोपे काम झाले.
सध्या इथे मेक्सिको ला जायचे फार फॅड आहे असेच म्हणावे लागेल, बरेच लोक जात असतात. :biggrin: मेक्सिको मध्ये खरंतर कॅरीबियन साईड ला कॅन्कून ला जायची जास्त इच्छा होती, कारण मायन रूईन्स पहायचे होते. पण वेळेचे गणित जमले नाही त्यामुळे काबो सॅन लुकास या पश्चिम किनार्यालाच गेले, आमच्या जवळ म्हणून. इथे लँड्स एण्ड दिसेल अश्या रिसोर्ट मधे बुकींग केले. व नशीबाने अगदी रुम मधूनही सतत निळाशर समुद्र व लँड्स एण्ड चे पांढरे खडक दिसत होते. पहाटे व सांजवेळी अत्यंत नयनरम्य द्रूष्य दिसत होती.
मुलींनी डॉल्फिन राईड घेतली, आम्ही सर्वांनी बरेच कायकिंग केले, स्नॉर्केलिंग चा ही प्रयत्न केला पण ते काही म्हणावे तितके जमले नाही. बाकी लिहीते अजून उद्या पर्यंत.
अरे वा, काय फटाफट फोटो अपलोड झाले. हे काम ब्येस झालं. आता माझ्या अत्यंत दिल के करीब पीसीएच चे पण टाकेन. बस्के, भारी काम केलंस.
1710
1708
1707
1705
1706
1704
1703
1702
1709