पेटी/राग - बेसिक्स

मी नीलला सिथेंसायझरवर त्याचे नर्सरी र्हाईम्स वाजवून दाखवत असते. आज काही केल्या इफ युआर हॅपी & यु नो इटची तिसरी ओळ वाजवता येईना.. मग वैतागून मी सारेगमपच वाजवत बसले. वाजवता मूड लागला आणि लहान असताना क्षीरसागर आज्जींकडे शिकलेली पेटी आठवू लागली .. आणि त्या मसल मेमरीतून मी खालील प्रकार वाजवला. हा राग भूप आहे का? आणि बरोबर आहे का? तसं असेल तर याच्या पुढचा राग कोणता शिकू मी?

मी हे वाजवले.. बहुतेक बरोबर टाईप केले असावे.. वरचा सा रे ग कसा लिहायचा नाही माहित. दुसर्‍या व तिसर्‍या ओळीत वरचे सा रे आहेत.

ध सा ध प ग रे सा रे ग ग रे ग प ध प
ग ग ग ग प प ध ध सा सा ध रे सा
ध सा रे ग रे सा ध प
ध सा रे सा ध प ग रे सा

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle