यावर्षी पुन्हा एकदा ह्ंपी ट्रीप केली. माझ्यादृष्टीने ही आठवी खेप!! सतिशची तिसरी. लेकीची दुसरी (पण पहिल्यावेली ती अगदीच अडीच वर्षाची होती)
मला हंपीमध्ये मनसोक्त भटकायला आवडतं. इथली देवळे पडकी आहेत. भयाण आहेत वगैरे सर्व मान्य आहे तरी ती सुंदर आहेत.
आम्ही आमच्यासाठी कस्टमाइझ केलेली यावेळची ट्रीप पुढील प्रमाणे.
दि. १ रत्नागिरी सकाळी सहाला सोडणे. वाटेत आंब्यामध्ये नाश्ता. कोल्हापूर साधारण १० वाजता. महालक्ष्मीदर्शन आणि कोल्हापूर खाऊगिरी करून निपाणी-चिकोडी. चिकोडीमध्ये लिंगायत खाणावळीमध्ये दीड वाजता जेवण. तिथून तासाबह्रावर गोकाक. धबधबा पाहून गोकाक मिलमध्ये खरेदी करून चहा घेऊन बागलकोटकडे प्रयाण. संध्याकाळी सात वाजता बागलकोट. इथे मुक्काम.
दि. २. पहाटे आवरून इरण्णाचे दर्शन. हे आमचे ग्रामदैवत. इथून मुचखंडीचे धरण (१८८१ साली बांधलेले) पाहून आमच्या नावाचे डोंगर पाहून मग नाश्ता केला. तिहून बागलकोट तलाठी हापिस आणि कोर्ट अशा दोन ठिकाणी हजेरी देणे! दुपारी बारा वाजता जेवून ऐहोळे पट्टदकल्ल (अंतर सा. ४० किमी) बघायला बाहेर पडलो. ऐहोळे आनि पट्टदकल्ल दोन्ही बघायला साधारण चार तास लागतात. ठिकाणे जवळजवळ आहेत. गाइडची सोय आहे. उत्तम वॉशरूम्स आहेत. खाण्यासाठी थोडे फार स्टॉल्स आहेत.
दि. ३ परत सकाळी आवरून कोर्टात हाजरी. ते काम आटोपले मग लॉज सोडून बदामीला निघालो.. बागलकोट बदामी ३० किमी. आधी बनशंकरीला गेलो. पाऊस असल्याने गर्दी नव्हती, त्यामुळे सु^दर दर्शन झाले. अधिक महिना असल्याने देवी अधिक खुश असावी कारण माझ्याकडून तिने साडी नेसवून घेतली. (वो किस्सा फिर कभी!!) दर्शन घेऊन बदामीची चाल्क्यकालीन लेणी पहायला गेलो. चार लेणी आहेत. ती बघायला दोनेक तास लागतात. ती पाहून मग भूतानाथ कॉम्प्लेक्स आणि अगस्त्य लेक पाहून परत बागलकोट. गाईडची सोय आहे. वॉशरूम्स आहेत पण इथे माकडांचा खूप त्रास आहे. दुपारी आसपासची काही एक दोन देवळे शोधत फिरलो. तर महाकूटेश्वर म्हणून एक चालुक्यकालीन मंदिर आढळले. दुरेख काम आणि अद्याप पूजा होत आहे. इथेच आम्हाला देवळामध्ये प्रसादाचे जेवण मिळाले. पोटभर अन्नासारू जेवलो. मग गूगल मॅपच्या सह्हायाने अजून एक दोन पार्वतीची देवळे पाहत हंपीकडे निघालो. हंपीला रात्री नऊ वाजता पोचलो. अख्ंड बदामी हंपी रस्ता पाऊस होता. त्यामुळे कणसे खात प्रवास केला.
(ताक. वास्तविक बागलकोट हे केवळ माझे काम होते म्हणून इथे मुक्काम केला. अन्यथा बदामीमध्ये मुक्कामासाठी सोयी आहेत. बदामी ऐहोळे पट्टद्कल्ल हे एका दिवसात सहज अक्रता येण्यासारखे आहे. माझे काम असल्याने आम्हाला दोन दिवस लागले)
दि. ४ रात्री पोचल्यावर हंपीला पहिल्या दिवशी मयुर भुवनेश्वरीला उतरलो. रूम्स छान आहेत पण बाकी काही सोयी विशेष नाहीत. एकमेव फायदा की हंपीच्या एकदम जवळ हॉटेल आहे. दुसर्या दिवशी ही रूम चेंज करून क्लार्क्स इनला गेलो कारण बुकिंग एकाच दिवसाचे केले होते. भुवनेश्वरीमध्ये जेवण फालतू आणि function at() { [native code] }इ उशीर करणारे. हे कर्नातका टूरिझमचे असूनही अवस्था वाईट आहे. त्यामानाने बजेटमध्ये क्लार्क्स इन सारखेच आहे, पण सोयीसुविधा आणि रूम्स सुरेख आहेत.
नाश्ता करून सकाळी सातला फिरायला सुरुवात केली. गाईड घेतला होता, कारण त्यांना रस्ते परफेक्ट माहीत असतात. सुरुवातीला राजवाडा परिसर फिरून मग जेवलो. मग विजय विट्ठल मंदिर परिसर आणि म्युझियम फिरलो. जेवण्यासाठी गाइडने एका सुरेख हॉटेलमध्ये नेले होते. चविष्ट जेवण होते. संध्याकाळी तुंगभद्रा डॅम बघायला गेलो. तिथे म्युझिकल कारंजी पाहिली. खास काही नाही. पण सतिशला धरणे आणि वीजनिर्मिती मध्ये वगैरे जरा रस आहे, त्यामुळे तो खुश होता. मग परत आलो. बाहेरच एका छोट्या पण लोकल हॉटेलमध्ये जेवलो आणि जोजो.
या एका दिवसामध्ये हंपीमधले मेजर टूरिस्ट पॉइंट्स कव्हर होतात. विजय विठ्ठल मंदिराची शान अर्थात त्याचे म्युझिकल पिलर्स आहेत. आता तिथे वर जायला परवानगी नाही. पण हंपीमधे दोन तीन पडकी देवळे आहेत जिथे असे एक दोन म्युझिकल खांब आहेत. तिथे जाऊन ते पाहता येतात.
दि. ५ दुसर्या दिवशी पहाटे उठून विरूपाक्ष मंदिरामध्ये गेलो. तिथे दर्शन घेऊन यंत्रोधारक मारूतीच्या देवळात गेलो. मला हे देऊळ आणि त्याची संकल्पना जाम आवडते. तिथून मग आनेगुंडीला गेलो. मारूतीचे जन्मस्थान असलेल्या पर्वतावर चढायचे होते. ५३३ पायर्या. मी सतिश आणि सुनिधी चढलो. सासूसासरे खाली बसले. वर देऊळ काही ग्रेट नाही पण व्यु जबरदस्त. तिथून मग शबरीची गुंफा, पंपा सरोवर, कोदंडधारी राम, मार्कंडेय वगैरे करून दुपारी जेवलो. इथेच बनाना सिल्क्सच्या साड्या मिळणारे कर्नाटका टुरिझमचे दुकान आहे. तिथे भरल्या पोटाने खिसा जरा रिकामा केला. मग वाटेत एक दोन फार प्रसिद्ध नस्णारी पण विलक्षण अशी देवळे शोधत फिरलो. चंद्रशेखर मंदिर, सरस्वती मंदिर, पाताळेश्वर, जंबुकेश्वर वगैरे. आणि मग साडेपाचच्या दरम्यान हंपी सोडले. बागलकोटला रात्री साडेनऊला पोचलो. जेवलो की जोजो. कोल्हापूर बंद असल्याच्या बातम्या येत होत्या, त्यामुले आधी रस्ता कसा आहे ते पाहून मग बागलकोट सोडले.
दि. ६ बागलकोट ते रत्नागिरी. वाटेमध्ये एक दोन ओळखीची देवळे आणि स्पॉट पाहिले. कोल्हापूरला गोकुळमध्ये जेवलो. आंबा घाट दुपारी चारच्या आत क्रॉस करणे हा टास्क होता. त्यामुळे लवकर निघालो. इथे कोकणात या दरम्यान वेड्यासारखा पाऊस कोसळत होता. त्यामुले आंबा घाट धोकादायक बनला होता. पंचगंगेचे पाणी आजूबाजूला पसरलेले दिसतच होते. तरी घरी सुखरूप पोचलो.
सोबत दोन सिनिअर सिटीझन असल्याने फार वेगाने चालणे शक्य होत नव्हते. आम्ही सावकाश फिरत होतो. एरवी जिथे तीन तासात पाहून होईल असे स्पॉट आम्ही साडेचार तासात कव्हर केले. तरी दुसर्या दिवशी त्या^ना तुम्ही गाडीत बसा आम्ही फिरतो असे सांगून थोडे भटकलो.
जेवण मी सर्वत्र लोकल लिंगायत खाणावळी/ हॉटेलमध्ये घेतले. हे माझे आवडते क्युझिन आहे. हे प्रचंड स्वस्त असते. आर्थात हंपीमध्ये परदेशी अप्रय्टक असल्याने जगबह्रामधील क्युझिन्स उपलब्ध असतात. त्यामुळे तो फारसा त्रास होत नाही. हंपीमध्ये लोकल टूव्हीअल्र रेंटवर मिळतात. त्यावरून फिरणे सर्वात बेस्ट आहे. कारण खूप ठिकाणे पटापट कव्हर होतात.