लागणारं साहित्य-
पातीच्या कांद्याची पात- आडवी/स्लाईस चिरुन (आवडीप्रमाणे), भाजलेले तीळ- साधारण दोन टेस्पून, आलं, लसूण किसून- साधारण एक टीस्पून, रेड चिली फ्लेक्स- आवडीप्रमाणे, एखादं फ्लेवर्ड तेल- माझ्याकडे टोस्टेड तीळाचं तेल होतं तेच घेतलं, स्पॅगेटी किंवा लिंग्विनी (पॅकेटच्या इन्स्ट्रक्श्न्सप्रमाणे शिजवून निथळून), एखादा चिली सॉस्/सिराचा वगैरे, मिसो पेस्ट- दोन चमचे, सोया सॉस- दोन चमचे, मीठ, किंचीत साखर, पसरट बोल.
कृती- पाणी उकळत ठेवून त्यात तेल घालून स्पॅगेटी/लिंग्वीनी पॅकेटवर सांगितल्याप्रमाणे शिजत ठेवावी.
एकीकडे पसरट बोलमध्ये आडवी चिरलेली कांद्याची पात, भाजलेले तीळ, चिली फ्लेक्स, आलं-लसूण पेस्ट घालून मिक्स करावं. पळीत साधारण चार टेबलस्पून फ्लेवर्ड तेल गरम करत ठेवायचं. साधारण ते स्मोकिंग पॉईंटला येईपर्यंत गरम करुन बोलमधल्या मिश्रणात घालायचं आणि पुन्हा मिक्स करुन त्यात चिली सॉस, सोया सॉस, मिसो पेस्ट, मीठ, साखर घालून मिक्स करुन घ्यायचं. नूडल्स शिजल्या असतील तर त्या ड्रेन करुन त्याही ह्यात मिक्स करुन गरम गरम खायचं.
टीपा- माझ्याकडे व्हेरी व्हेरी तेरियाकी सॉस नेहमी असतोच त्यामुळे तो ही थोडा मिक्स केला.
व्हिनेगर हवं असल्यास चमचाभर घालू शकता.
ही रेसिपी मध्यंतरी इन्स्टावर बघून दोन दिवसांपूर्वी करुनही बघितली आणि खूपच आवडली.