साहित्य - हिरवी/जांभळी वांगी (वाडीची असतील तर सोनेपे सुहागा) , दाण्याचे कूट,ओलं / सुकं खोबर्यचा किस, चवीनुसार तिखट अन मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर अन सगळ्यात महत्वाच वाटीभर दूध!
कृती -
वांगी धुवून लांबट फोडी करून घ्या.
कढईत नेहमीसारखी मोहरी,जिरे,हिंग अन कडीपत्ता घालून फोडणी करा.त्यात वांग्याच्या फोडी घाला अन परतून घ्या. फोडी जरा लालसर झाल्या की त्यात तिखट, मीठ, हळद , दाण्याच कूट , खोबरं अन कोथिंबीर घालून नीट परतून घ्या.सगळ्या फोडीना मसाला नीट लागेल अस परतून घ्या. आता त्यात दूध घालून कढईवर झाकण ठेवून नीट शिजवा. जर वांगी शिजताना दूध कमी वाटलं तर थोडस पाणी घाला, दोन्ही अर्ध अर्ध वापरू शकतो.
मी जे तिखट लिहलय त्यात मिरची , खडे मसाले , खोबरं अस सगळ घालुन वर्षभराच तिखट करते.. तुम्ही फक्त मिरचीपुड वापरत असाल तर थोडासा गरम मसाला पण भाजीत घाला
दूध घातलं की भाजीला रंग अन क्रीमी टेक्शचर येत ही स्पेशल टीप आईची आहे. अशीच दोडक्याची भाजी करता येते.