घरात एक वाद्यांचं कपाट होतं सुताराकडून मापं देवून बनवलं होतं पूर्वी. तबला डग्गा आणि छोटा तानपुरा असायचा त्यात. लेक सासरी जाताना फक्त वाद्यं घेवून गेली त्यातली. मग कपाट तसंच राहीलं. हळू हळू काहीबाही ठेवत गेले. काल असंच पाहिलं तर बरं नाही वाटलं. नवी अपारदर्शक दारं बनवावीत म्हणजे आतमधे काहीही ठेवता येईल असं वाटत होतं तोच एका मैत्रीणीकडून ही कल्पना मिळाली. एक जुनी रेशमी ओढणी फाडून काचेला आतून ताणून चिकटवली आणि आता छान दिसतंय. रु. "फू" मधे हे जमून आल्यामुळे जास्त आनंद झालेला आहे ह्या ठिकानी
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle