आज ३-४ दिवस टिकण्यार्या म्हणून बाजरी-मेथीच्या पुर्या करुन पाहिल्या, पण इतक्या मस्त लागतायत की उद्याच संपतील. खूप छान लागतात म्हणून इथे पाकॄ देते आहे. खरंतर आपल्या नेहमीच्या तिखटमीठाच्या पुरीपेक्षा फार काही वेगळी पद्धत नाहिये.
साहित्यः
बाजरी पीठ ३ वाट्या
डाळीच पीठ २ चमचे
कणिक / गव्हाचे पीठ १/२ वाटी ( घातल नाही तरी चालेल)
मेथी बारीक चिरुन १.५ वाटी
कोथिंबीर १/२ वाटी
तिळ ६-७ चमचे
१.५ चमचा ओवा
लसुण, आलं, मिरची, जिरे, मीठ वाटण चवी नुसार
हळद
तिखट
हिंग
धने पावडर
कोकमपावडर / आमचूर पावडर
तेल चमचाभर
वरील सगळे पदार्थ एकत्र मिसळून पीठ घट्ट मळून घ्यायच आणि पीठावर किंवा तेलावर छोट्या नेहमीपेक्षा जाडसर पुर्या लाटून तळायच्या. बाजरीमुळे मोठ्या पुर्या लाटताना कडा नीट राहत नाहीत.
दही, चटणी, सॉस किंवा नुसत्याच खाऊन संपतात.