नाचणी (रागी) डोसा

साहित्य -
१ वाटी नाचणी
१/२ वाटी उडीद डाळ
१/२ वाटी पोहे
१/२ टीस्पून मेथी

कृती -
फारच सोपी पद्धत आहे
नाचणी, उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या
त्यातच पोहे अन् मेथी अन् पाणी घालून भिजवा.. किमान ५ तासातरी भिजवून ठेवा
रात्री हे सगळ मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या अन् फरमेंत करायला ठेवा
सकाळी पीठ मस्त फुगून येत, चवीप्रमाणे मीठ घालून कुरकुरीत डोसे करा

डाएट अन पौष्टिक दोन्ही गोष्टी होतात.. पहिल्यांदा केलेत त्यामुळे मला वाटल होत की चव जरा वेगळी / earthy लागेल पण चव छानच होती
ह्याच पीठात टोमॅटो , कांदा घालून उत्तप्पा / आप्पे होतील

नाचणी पीठ असेल तर ते वेगळ भिजवून मग त्यात उडीद पोहे मेथी वाटण घालून फरमेंत
करता येईल.. एक व्हिडिओ असा बघितला होता, मी केलं नाहीय

img-20240222-wa00002.jpeg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle