कॉफी आणि बरच काही!
महंगी तो फुर्सत है जनाब, सुकून तो आज भी सस्ता है
कॉफी की प्याली में भी मिल जाता है।
अशी ही कॉफी जी अफाट माणसांच्या गर्दीत असूनही एकटे पणाचा शोध घ्यायला लावनारी किंवा
एक कप कॉफी और तुम काफी हो,
मेरे दिन भर की थकान मिटाने के लिए। अस म्हणत आपल्या प्रिय व्यक्तित सार जग शोधनारी वक्ती आणि तीला साथ देनारी कॉफी.
कॉफ़ी आपल्या भारतीय खादय संस्कृति चा अविभाज्य भाग, अगदी दक्षिण भारतीय लोकाइतक दिवसाची सुरवात करण्याइतपत नसली तरी, आपल्यालाही येखाद्या अवचित पावसाच्य। किंवा अगदी डिसेंबरच्या गुलाबी थंडीत कधीतरी गरमागरम कॉफी पिण्याचा मोह होतोच.
नुकताच ट्रेकिंगच्या निमित्ताने पुन्हा एकदा चिकमंगळूरला जाण्याचा योग आला. चिकमंगळूर आणि कॉफी हे तर एक समीकरणच.
मंगळूर पासून अगदी २०० किमीचा प्रवास. जसजसे चिकमंगळूर भागाची सुरुवात होते, दूरवर पसरलेले कॉफीमळे चे दिसू लागतात.
भारतात प्रथम कॉफी कशी आली याचा इतिहास थोडासा अनोखा आहे. असं म्हटलं जातं सोळाव्या शतकाच्या सुमारास भारतीय मुस्लिम संत बाबा बुडान हे मक्का येथील धार्मिक स्थळासाठी भेट देण्यास गेले होते येताना त्यांनी दाढी मध्ये लपवून ७ कॉफीच्या बिया आल्या होत्या त्यांनी ह्या बिया चिकमंगळूर मधील चंद्रदोन गिरी या टेकडीवर पुनरजीवित केल्या आणि अशाप्रकारे कॉफीचा भारतातील प्रवास सुरू झाला. कालांतराने हा प्रवास वाढत जाऊन तो दक्षिण भारतामधील वायनाड आणि निलगिरी पर्वतावर बसला.
पूर्वीही बराच वेळा कॉफीच्या मळ्यांमधून ट्रेक करण्याचा योग आला होता पण यावेळी पहिल्यांदाच कॉफीच्या फुलांना पाहण्याचा योग आला. ही फुलं अगदी रातरानी किंवा मोगऱ्यासारखे दिसणारी आणि सुवास ही अगदी मंद दरवळणारा. हे कॉफीचे मळे दूरवर पसरलेले असतात त्यामुळे ही फुले ही बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळाली. दूरवर पसरलेले ते पांढऱ्या फुलांचे ताटवे आणि तो दरवळणारा मंद आणि तितकाच मनाला हवाहवा वाटनारा सुवास, खर तर याला शब्दात मांडताना येन अशक्य कारण अशा गोष्टी फक्त अनुभवता येतात आणि दूर कुठे मनाच्या कप्प्यात साठवता येतात.
खरतर त्या फूलाना केसात घालन्याचा मोह ही झाला.
दहा किलोमीटरच्या ट्रेक मध्ये जवळपास दोन किलोमीटर तरी कॉफीच्या मळ्यांमधून चालण्याची संधी मिळाली. दुपारी भर उन्हात चालतानाही मनात एक विचार येऊन गेला, या कॉफीच्या मळ्यांमध्ये पौर्णिमेच्या रात्री या कॉफीच्या मळ्यामधून चालनाच्या अनुभव कसा असेल. त्या चंद्राच्या मंद प्रकाशात ही अगणित पांढरी फुले अगदी लुकलुकणाऱ्या ताऱ्या प्रमाणे भासतील. हातात एकदम गरमागरम असा कॉफीचा मग, आणि आवडीचे एखादं गाण
चांदनी रात मे एक बार तुझे देखा है। खुद पे इतराते हुए , खुद से शर्माते हुए।
थोड्याच क्षणात मी दिवास्वप्नातून बाहेर आले, आणि परत एकदा त्या सुंदर फुलांना डोळ्यात साठवू लागले.
Reva....