झपूर्झा गडे झपूर्झा - एक सुंदर अनुभूती!

नुकत्याच केलेल्या भारतवारीत पुण्यात आठवडाभर होते. तेव्हा एक दिवस झपूर्झा म्युझिअमला जाण्याचा योग जुळून आला. फार सुंदर म्युझिअम आणि संपूर्ण परिसर, आणि अनुभव! त्या अप्रतिम अनुभवाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते.

z1.png

बावधान भागातून साधारण ४०-४५ मिनीटे अंतरावर खडकवासला तलावाच्या काठावर, निसर्गरम्य परिसरात हा म्युझिअम उभारला आहे. दागिन्यांकरीता प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ यांचा हा उपक्रम आहे. त्यांच्या वेबसाईटवरून ही माहिती इथे पोस्ट करते.

Zapurza is an art initiative by PN Gadgil & Sons, a leading jewellery brand with 190 years of legacy. It is a ‘not for profit’ organisation set up with a purpose of promoting and conserving Indian arts & art forms; and to reach out to the society, especially the children.

It aims at promoting a sense of aesthetics in young minds by introducing various arts & culture of this country. Purpose of Zapurza is to use “museum as a learning resource” for all ages. We believe that Art is an integral part of human life and it enriches the lives of people through understanding & appreciating various arts & the cultural fabric.

The name “Zapurza” is inspired by a poem of the same title by Keshavsut, a Marathi poet. It broadly means, ‘A creative state of mind.’ When one is filled with joy of creation and where the worldly worries and concerns are left behind.

Zapurza museum of art and culture is a sole entity of P. N. GADGIL ART & CULTURE FOUNDATION.

भारताचा, प्रामुख्याने महाराष्ट्राचा कला-इतिहास, सांस्कृतीक ठेव्याची, ऐतिहासिक गोष्टींची लोकांना माहिती व्हावी, त्यांचं जतन व्हावं या उद्देशाने बांधलेल्या या संग्रहालयात वेगवेगळी दालनं आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागांतील/विविध कालातील साड्या, त्यांचे प्रकार, दाग- दागिने, पुरातन दिवे - त्यांचे विविध प्रकार, विविध मूर्ती, धातूकामाच्या गोष्टी, चित्रकला, इतर हस्तकलेच्या वस्तू, कोरीव काम केलेल्या वस्तू - या प्रत्येकाचं एकेक दालन! या दालनांमध्ये सर्व वस्तू मांडल्या देखील आहेत एकदम कलात्मकतेने! क्युरेटर्सनी घेतलेली मेहेनत दिसते.

काही अगदी निवडक वस्तूंचे टीझर फोटोज टाकते. (तिथे फोटोग्राफीला परवानगी आहे!) बाकी तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊनच पहा.

z2.png

z3.png

z4.png

z5.png

z6.png

z6_0.png

आतील वस्तू आणि दालनं तर सुंदर आहेतच, पण इमारतीचे बांधकाम, तिची रचना, कलात्मकता, आत जिन्याशेजारून जाणारा indoor झरा, त्याच्याभोवती लावलेली आकर्षक झाडं सगळंच बघण्याजोगं. वरच्या त्या फोटोतले ते दोन बसायचे बेंचेस हे एक उदाहरणार्थ बघा. किती सुंदर बेंचेस, त्यामागची झाडं, ते लोखंडी ग्रिल्स पण किती कलात्मक! असं सौदर्यं जागी-जागी विखुरलंय. आणि मुख्य म्हणजे कमालीची स्वच्छता आणि शांतता. अगदी शांत-क्लांत अनुभुती!

हा संग्रहालय केवळ आतूनच नव्हे तर बाहेरून, बाहेरचा परिसरही बघण्याजोगा आहे. वर म्हटल्याप्रमाणे खडकवासला तलावाच्या सुंदर परिसरात हा वसलाय, प्रचंड मोठ्या जागेत. यात बाहेर सुंदर बाग, झाडे, एक outdoor ॲम्फीथिएटर, काही कार्यक्रम/पार्टीकरीता देण्यात येणारी लॉन्स असं सगळं आहे. आणि तीच ती वेडावणारी सुखद गहिरी शांतता!
परिसराचे काही फोटो.

z7.jpg

z9.jpg

z10.jpg

z11.jpg

बाहेर ठिकठिकाणी सुंदर-सुंदर धातूशिल्पं वसवली आहेत. आवडलेली काही:

z13.png

हे धनगर, त्यांच्या शेळ्या-मेंढ्या असं जमावाचं मोठ्ठं धातूशिल्प तर फारच सुंदर आहे. कितीतरी वेळ आम्ही यातील प्रत्येक शिल्प, त्यातले डिटेल्स पहात होतो!

20240312_133212.jpg

z15.png

z16.jpg

z17.jpg

संग्रहालयाच्या परिसराच्या टोकाला एक शांत, सुंदर, छोटंस शिवमंदीर आहे. त्याच्याकडे जायचा रस्तादेखील सुंदर आहे.
shiv.jpg

हा परिसरातल्या "शांततेचा" व्हिडीओ.

एक छोटं तलावाभिमुख कँटिन, त्यात निवडक, चविष्ठ महाराष्ट्रीय पदार्थ (आम्ही अर्थात वडे खाल्ले), पार्श्वभूमीवर मंद स्वरात चालू असलेली मराठी भावगीतं...सारंच अभिरूचीपूर्ण! गाणी देखील नीट निवडून लावली आहेत हे जाणवते. सगळ्याच गोष्टींत मेहेनत दिसून येते.

याखेरीज इथे विविध कार्यशाळा - चित्रकला, पॉटरी इ. चालू असतात. त्यांच्या वेळा बघून जाऊन ते देखील करता येईल (वेगळे पैसे भरून!). गाण्याचे, वादनाचे, क्लासिकल नाचाचे कार्यक्रम वीकांतांना असतात. त्यांचंही वेळापत्रक बघून जावं लागेल.
या सर्व अनुभूतीकरीता तिकीट अगदी वाजवी - रु. १००!

तर मैत्रिणींनो, अर्धा दिवस अगदी मस्त जाईल आणि एक सुंदर जागा बघितल्याचं समाधान मिळेल असं हे स्थान! नक्की कधीतरी जा!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle