बाली सफारी अ‍ॅन्ड मरिन पार्क

पहिल्या दिवशीच्या अनुभवावरुन आम्ही तीन दिवसांसाठी गाडीच बुक केली. ड्रायवरने आधीच सांगितले कि मला इंग्लिश जास्त येत नाही पण तुम्हाला कुठे जायचे आहे ते ठिकाण मला माहिती आहे.
तर मग आम्ही निघालो बाली सफारी आणि मरिन पार्कला. कुटापासुन हे ठिकाण जवळजवळ २०किमी आहे. जाण्यासाठी बसेस पण आहेत. फक्त बसेसची वेळ व्यवस्थित पाहुन जायला हवे. हे एक जंगल सफारीसाठी तयार केलेले पार्क आहे. पार्कमधे आपल्याला पायी फिरता येते त्याच बरोबर एसीबसमधे ४५ मि. सफारीही असते. आपल्याला हवे असल्यास एलिफंट सफारीही घेउ शकतो. टिकिट मात्र थोडेसे महाग आहे. आम्ही बेसिकच पॅकेज घेतले कारण एवढ्या उन्हात एलिफंट सफारी करायची इच्छा नव्हती. तिकिट मात्र जमल्यास आधीच ऑनलाईन बुक करुन जा. कारण तिथे टिकिटासाठी भरपुर गर्दी असते. पार्कमधे आपण आपल्याजवळचे पाणी आणि खाद्यपदार्थ नेउ शकत नाही पण आतमधे २-३ रेस्टॉरंट्स आहेत.
(मॅप मी स्कॅनकरुन लवकरच टाकते).

इथे दिवसभर प्राण्यांचे वेगवेगळे शो चालु असतात. मॅपवर वेळ दिलेली होती. तिकिटासाठीच्या गर्दीमुळे आमचे बरेचसे शो चुकले. बेसिक पॅकेजमधे तुम्हाला सगळे शो बघता येतात. तिकिट घेउन प्रवेश केल्यावर तुम्हाला एक बस आतमधे घेउन जाते. तिथुन मग तुम्ही पायी फिरु शकतात. थोडेफार झू सारखेच आहे.

आम्ही सगळ्यात पहिले elephant conservation show पाहिला. हे एक छोटसं नाटुकलचं होत पण त्यात हत्तीसुद्धा अभिनय करत होते.

तिथेच एक हत्ती आणि एक पिल्लु होते. त्याला तुम्ही फळे विकत घेउन खाउ शकत होते.

त्यानंतर सरपटणार्‍या प्राण्यांचा विभागही होता जिथे तुम्ही अजगरला गळ्यात घेउन फोटो काढु शकतात. अशा प्राण्यांची मात्र मला दया येत होती. एकंदरीत तो प्रकार फारसा आवडला नाही.

तिथेच एक रणथंबोर विभागही होता. त्यात पांढरा वाघ ठेवला होता.

टायगर फिडींगचाही वेळ दिलेला होता. त्यावेळेस तुम्ही तिथे जाउन वाघाचे जेवण बघु शकतात. त्याचप्रमाणे हत्तीची आंघोळ, हत्तीचे जेवळ, पिरान्हाचे जेवण असे बरेच काही होते.

प्रत्येक पॅकेज मधे एक सफारी होती. यात एसी बस मधे पूर्ण जंगल फिरवुन आणतात. त्यासाठी वेगळ्या प्रकारची बस आहे आणि वेगळे रोडसुद्धा. इथे सगळे प्राणी मोकळे सोडलेले होते. तुम्ही बसच्या काचेतुन या प्राण्यांना जवळुन बघु शकतात. मायबोलीवरची फेमस नील गाय पण होती इथे.

खोटा हत्ती

तिथेच एक गणपतीची भव्य मूर्ती होती. आशियातली कितव्यातरी क्रमांकाची मोठी मुर्ती आहे ती.

हे एक स्टेज जिथे डान्सचा कार्यक्र्म होतो.

जेवणासाठी तिथे तिन रेस्टॉरंट्स होती आम्ही त्यातल्या हत्तीच्या विभागाजवळच्या रेस्टॉरंटमधे जेवलो. आम्हाला वाटत होते कि लोकांना इथे खाण्याशिवाय काही पर्याय नसल्याने इथे सगळे परार्थ महाग असतील पण किंमत अगदीच वाजवी होती आणि जेवणसुद्धा सुंदर होते. आम्हाला इथला बालीमधला सर्वात छान फ्राईड राइस खायचा मिळाला.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle