मोजक्या साहित्यात सर्वाना आवडेल अशी खात्रीशीर रेसिपी आहे. फक्त थोडा वेळ घेणारी कृती आहे. तर आता कृती सांगते.
साहित्य :-
बालू शाही साहित्य:---- 2 -1/2 कप मैदा 1 टी स्पून बेकिंग पावडर चवीपुरते मीठ 1/2 कप तुपाचे मोहन
साखरेचा पाक:-----
3 कप साखर
1/4 टी स्पून केशरी रंग केशर चिमूटभर
1/2 टी स्पून वेलची पूड 1 कप पाणी तळण्याकरता अंदाजे 1- 1/4 कप तूप. कृती :
१) मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र चाळून घ्या. त्यात तुपाचे मोहन घालून सर्व पीठ छान एकत्र करा. 1 कप पाणी थोडे थोडे घालून पिठाचा हलक्या हाताने एक गोळा तयार करा. खूप दाबून गोळा तयार करू नका. आता हे पीठ मुरण्यासाठी झाकून ठेवा. २)आता एका पसरट पॅन मध्ये 1 कप पाणी आणि साखर घालून पाक करायला मध्यम आचेवर गॅस वर ठेवा.एका चमच्याने पाक ढवळत रहा. त्यात वेलची पूड घाला. साखर विरघळली की केशरी रंग आणि केशर काड्या चुरून टाका. पाक उकळायला लागला की गॅस बंद करा. पाक तयार झाला. 3]आता दुसर्या पॅन मध्ये तळायचे तूप टाकून मंद गॅस वर ठेवा. भिजवलेल्या मैद्याचे ,लहान लहान एकसारखे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा तळहातावर ठेवुन दुसर्या हाताने गोल फिरवून चपटा पेढा तयार करा.या पिढ्यांच्या मध्ये एक गोल आरपार भोक करा त्याकरता गोल बुडाचा चमचा किंवा लाकडी रवी वापरता येईल. असे केल्याने बालुशाही तळताना आतून खरपूस तळली जाईल आणि कच्ची / गिच्च होणार नाही.या महत्वाच्या टीप नंतर आता पुढची स्टेप. 4]पॅन मधील मध्यम तापलेल्या तूपात 4 बालूशाही तळायला टाका. गॅस मंद असावा. साधारण 4 -5 मिनिटात या बालूशाही फुलून वर येतील. आता झार्याने एकेक करुन उलटवा.पुन्हा 3-4 मिनिटाने उलटवा.अशा रितीने दोन्हीकडून थोडा बदामी रंग येईपर्यंत तळून लगेच आधी करुन ठेवलेल्या पाकात सोडा.पुढचा घाणा तळून झाला कि पाकातल्या बालुशाही एका ताटात काढून ठेवा.वरुन पिस्ता ,बदाम काप लावा. अतिशय खुसखुशीत बेतशीर गोड बालुशाही चा आस्वाद घ्या. टीप: बालू शाही तळण्याची मेख आहे. मंद गॅसवर दोन्ही बाजूनी बदामी रंग येई पर्यंत तळा. बालू शाही पाकात टाकण्यापूर्वी पाक गरम असावा. जर पाक घट्ट झाला असेल तर 2/3 चमचे पाणी घालावे.
विशेष :- दूध किंवा खवा, मिल्क पावडर वापरले नाही.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle