मी विकेंडला ही दोन टाईपची डेझर्ट्स केली. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि हवीत तितकी वेरिएशन्स करता येतील. ह्याची बेक वर्जन्सही करता येतात पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता.
साहित्य-
चीजकेक गुलाबजाम-
रुम टेंपला आलेलं क्रिम चीज, वितळलेलं बटर, मारी किंवा इतर डायजेस्टिव्ह बिस्किट्सचा चुरा, पिठीसाखर, व्हिपींग क्रिम, गुलाबजाम आणि ड्रायफ्रूट्चा चुरा.
कृती- बिस्कीटं मिक्सर्/फूड प्रोसेसरला फिरवून चुरा करुन घ्यायचा. त्यात वितळलेलं बटर घालायचं. बटर किती घालायचं तर चुरा अगदी मोकळा दिसता कामा नये आणि गच्च होता कामा नये.
एका मोठ्या बोलमध्ये रुम टेंपरेचरला आलेलं क्रिम चीज घेऊन ते हँड मिक्सरने फिरवून घ्यायचं. मऊसर झालं पाहिजे. त्यात चवीप्रमाणे पिठीसाखर घालून घ्यायची. एका वेगळ्या बोलमध्ये किंवा ह्यातच व्हिपींग क्रिम घेऊन सगळं हँड मिक्सरने एकत्र करुन घ्यायचं. ह्यात गुलाबजामचा पाक काढून टाकून थोडे गुजा तुकडे करुन घालायचे.
असेंबल करताना जर ट्रान्सपरंट बोल असेल तर जास्त छान दिसेल पण नसेल तरी ठीकच. तर बोलमध्ये सगळ्यात खाली बिस्किटांचा चुरा दाबून बसवायचा. त्यावर आईस्क्रिम स्कूपने हे क्रिम चीकचं मिक्स्चर घालायचं आणि वर एक गुलाबजाम ठेवायचा. आजूबाजूने ड्रायफ्रूट्सचा चुरा, एडिबल गुलाबपाकळ्या असल्यास भुरभुरायच्या.
चीजकेक ओरिओ-
सामान सगळं वरच्या प्रमाणेच. क्रिमचीजमध्ये ओरिओचा चुरा करुन मिक्स केलं आणि बेसलाही ओरिओचा चुरा दाबून बसवला. वर एक ओरिओ ठेवून सर्व केलं.
ही दोन्ही डेझर्ट्स सर्व्ह करण्यापूर्वी दोन तास तरी फ्रिजमध्ये(फ्रिझर नव्हे) ठेवावीत.
मला इथे शॉपराईटला हे असं रेडिमेड चीजकेक मिक्स दिसलं ते मी ओरिओला वापरलं.
गुलाबजामकरता मी खाली फोटो दिलेलं फिलाडेल्फिया क्रिमचीज वापरलं. तसंच गुलाबजामचा फोटो मी रिलवरुन घेतला आहे.
मी एंड रिझल्टचा फोटो काढायला विसरले पण ओरिओ असेम्बल करतानाचा हा फोटो आहे.
युट्युबवर भरपूर वेरिएशन्स आणि रेसिपीज आहेत ट्राय करायच्या असल्यास.