उग्गानी

लागणारा वेळ: १० मिनिटे

लागणारे जिन्नस:
चुरमुरे,
पंढरपुरी डाळे,
मिरची,
आलं,
लसूण,
कांदा,
टोमॅटो,
कोथिंबीर,
फोडणीसाठी मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, तेल

क्रमवार पाककृती:
एका भांड्यात चुरमुरे घेऊन त्यावर दोन पेरं येईल एवढं पाणी घाला. लगेचच हाताने एकदोनदा हलवून पाणी निथळून काढा. पाणी राहू देऊ नका नाहीतर गिच्च होतात चुरमुरे.
डाळं, मिरची, आलं, लसूण मिक्सर मधून बारीक पूड करून घ्या.
आता कढईत फोडणी करून त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्या. हवे असतील तर थोडे भाजलेले शेंगदाणे घालून परतून घ्या.
मग त्यात भिजवलेले चुरमुरे घालून नीट मिसळून घ्या. त्यावर मीठ घालून परत एकदा नीट मिसळून घ्या.
एक वाफ आली की लगेच डाळ्याची पूड वरून घालून नीट मिसळून घ्या.
छान एक दोन वाफा आल्या की गॅस बंद करा.
गरमागरम उग्गानी तयार.

वरून कोथिंबीर घालून, लिंबू पिळून खायला घ्या.

अधिक टिपा:
इकडे सकाळी सकाळी टिफीन सेंटरवर हा पदार्थ उपलब्ध असतो. यासोबत मिरचीची भजी देतात.
आपल्या कडे 'सुशीला' करतात त्याची नीट रेसिपी मला माहिती नाही.
पण यात लसूण मस्ट आहे. लसणाची चव लागली पाहिजे एवढा भरपूर लसूण घाला. निदान मला तरी ती लसणाची हलकी चव आवडली.
तुम्ही जास्त तिखट खात असाल तर फोडणीतही मिरची घालू शकता. आलं घातलंच पाहिजे असं नाही.
चुरमुरे भरपूर घ्या, कारण भिजून वाफ काढल्यावर ते आकसून एवढुस्से होतात.
डाळं पूड जास्त झाली तर फ्रिजमध्ये राहते. पण आठवडाभरात लगेच संपवा.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle