मी साबण नाही खाल्ला

आम्ही कुठेतरी कामासाठी बाहेरगावी होतो. एका मित्राने बाथरूममधून विचारलं, "हृषिकेश, तुझी आंघोळ झाली का?" त्यावर तंद्रीत असलेल्या हृषिकेशने उत्तर दिलं, "मी साबण नाही खाल्ला." त्यावरून त्याला चिडवलं तर म्हणाला, "ंमी खरंच साबण खाल्ला नाही. तुला खोटं वाटतं का?"

तेव्हापासून मला नवीन ऐडीया मिळाली. आपल्याला बरेचदा गैरसोयीचे प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरं या ठराविक लोकांना द्यायची नसतात. किंवा आपल्या खाजगी आयुष्याबद्दल सगळ्यांना सांगायचं नसतं. अशा वेळेस काय-वाट्टेल ती उत्तरं द्यायची.

प्र - तू नोकरी का करत नाहीस?
उ - मला वेळ नसतो फार.

प्र - तू नाव का नाही बदललंस?
उ - नवऱ्याचं नाव त्याने बदललं नाही, मी कसं बदलणार?

प्र - तू मंगळसूत्र, टिकली काहीच नाही का वापरत?
उ - शाळेत शिकवलं होतं, सुंदर अक्षर हाच खरा दागिना.

प्र - तू मेकप कर ना थोडा, चांगला दिसेल तुला.
उ - नाही निर्मळ जीवन काय करील साबण॥ असं मी नाही, तुकोबा म्हणून गेलेत.

असली उत्तरं एकतर अतिशय गांभीर्याने द्यायची किंवा आचरट हॅहॅहॅ करत. दोन-चारदा झालं की लांबचे लोक फंदात पडत नाहीत. लोकांना गॉसिपही फार आवडतं त्यामुळे असल्या चक्रमपणाच्या गोष्टीही लगे्च पसरतात.

रस्त्यात थांबवून कोणी फार गप्पा मारायला लागले आणि आपल्याला कटायचं असेल तर आपल्या पर्स/पिशवीकडे बोट दाखवायचं, "दूध आहे. नासेल." हा पर्याय भारतात चालेल. परदेशात इतपत वेळकाढूपणा कोणी करत असेल असं नाही.

(आत्ता मी पण घाईत आहे. नवऱ्याला आणायला एयरपोर्टावर जायचंय. पण प्रतिसादांमधून आहुत्या घालत राहू, सगळ्याच.)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle