बीट बटाटा सॅलड

बीट बटाटा सॅलड / कोशिंबीर

साहित्य -

२ उकडलेले बटाटे
२ उकडलेले बीट
१ टीस्पून तीळ
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून बडीशोप
१/४ टीस्पून साखर
चिमूटभर आलं (किसून)
चिमूटभर ओली हळद (किसून)
१ चमचा तेल (मी सूर्यफूल तेल वापरलं पण कोकोनट ऑईल सुद्धा चालेल असं नंतर वाटलं)
मीठ, मिरपूड,
बेसिलची पानं

कृती -

बीट आणि बटाटा दोन्हीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. त्यात मीठ, मिरपूड, साखर, किसलेलं आलं आणि ओली हळद सगळं एकत्र करा.

काढल्यात तेल गरम करून त्यात जिरे, मग तीळ आणि बडीशोप घालून ही फोडणी बाकीच्या साहित्यात मिसळून घ्या. बेसिल पानं असतील तर तेही घाला. दहा मिनिट झाकून ठेवा जेणेकरून फोडणीचा स्वाद सगळ्या साहित्याला नीट लागेल आणि सर्व्ह करा.

तळटीप -
बेसिलची पानं नसतील तर फोडणीत कढीपत्ताही वापरू शकता. मी मूळ पाककृती जर्मन लोकांसाठी करून पाहिली, त्यामुळे इथे सहज मिळू शकणारे घटक पदार्थ वापरले.

याशिवाय यात pine nuts (फोडणीत) किंवा अक्रोडाचे तुकडे हेही वापरू शकता.

याचा एक मीच केलेला व्हिडिओ आहे, पण त्यात भाषा जर्मन आहे. कृतीसाठी बघायचा असल्यास त्याची लिंक नंतर कमेंट्स मध्ये देऊ शकते.

screenshot_20250805-232924.png

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.