Hello सर्वांना .
9 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर अशी असम मेघालय ही ट्रिप मी नवरा आणी मुलगी अशी केली.
याचे प्लॅनिंग खूप आधीपासून म्हणजे डिसेंबर 24 पासून सुरू होते . आधी मे मधे जाणार होतो पण काही कारणाने ते जमले नाही.
ऑफीस घर काम याने आम्ही दोघे अन शाळा परिक्षा या चक्रात फिरून परी कंटाळून गेली होती.
तिची सहामाही 7 ऑक्टोबर ला संपणार होती. Yearly planner मधे ते दिलेले होते.
मग पुन्हा एकदा प्लॅन तपासून पाहिला अन पटापट बुकिंग केले.
पुणे ते गुवाहाटी थेट विमान प्रचंड अडनिड्या वेळेस होते. Departure 2:30 am ..arrival at Guwahati 5:50 am. यात पुर्ण रात्री ची वाट लागली असती. ट्रिप ची सुरूवात अशी नको होती.
मग आम्ही पुणे ते हैदराबाद मस्त ट्रेन ने गेलो आणी तिथून 4:30 pm ची डायरेक्ट फ्लाईट पकडली.
रात्री साडेसात ला तिथे ऊतरून लगेच शिलांग ला गेलो.
मेघालय सरकार ची ऑफीशियल वेबसाईट वर मी चेक केले होते. तिथे मला Walk with 9 Lives ही कंपनी बरी वाटली.
बेथ म्हणून मुलगी होती तिने माझ्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या समजून घेतल्या आणी थोडेफार बदल सुचवले.
गाडी आणी ड्रायव्हर चांगले हवेत ही मुख्य गरज होती. सेदान गाडी हवी कारण सामान नीट बसते आणी ड्रायव्हर गुटखा वगैरे खाणारा नको. English नीट येते असा पाहिजे म्हणून सांगितल.
सुदैवाने माईट हा खासी तरूण आमच्या अपेक्षांवर एकदम तंतोतंत ऊतरला.
टोयोटा etios होती. त्यामुळे सामान नीट बसले.
रात्री आम्ही The Heritage House म्हणून होम स्टे होता तिथे राहिलो. पुर्ण लाकडी घर होते मागे पुढे लाॅन एक पेरूचे झाड. केअर टेकर.
आता दोन मास्बेटर डरूम ज्यात डबल बेड होता. बाहेर एक बंक बेड.
मला खास आवडले नाही कारण खूप कंजेस्टेड वाटल.
दुसर्या दिवशी आवरून Laitium Canyon , Umiom lake, Williamson Sangma Museum; वार्ड लेक असे बघून मॅरियट ला चेक ईन केले.
रात्री सिटी हट धाबा जो पोलिस बझार मधे आहे तिथे जेवलो.
दुसर्या दिवशी extraw luggage मॅरियट ला ठेऊन एक बॅग घेऊन सोहरा ऊर्फ चेरापुंजी ला निघालो.
सुंदर हवा लख्ख ऊन खालपर्यंत ऊतरून आलेले ढग असे बघत तिथे पोचलो. 7 sisters waterfall, Noh Kalaikal falls , Arwah and Mawsawmi caves बघितल्या
दोन्ही गुहा छान आहेत. ऊतरून जाताना सुबक पायर्या धरायला कठडे आत गेल्यावर प्रकाश व्यवस्था अशी सोय केली आहे.
मधे मधे छोटे झरे दिसत होते तिथे थांबून छान पाण्यात ऊतरलेलो.
रात्री जिवा रिसाॅर्ट ला गेलो. पोटभर जेवण करून बाॅन फायर भोवती गप्पा मारल्या आणी लौकर झोपलो.
दुसरा दिवस खास होता कारण क्रेम पुरी . खासी मध्ये क्रेम म्हणजे गुहा.
ही अलीकडेच शोध लागलेली longest limestone cave आहे. तिथे जाऊन गाईड हेल्मेट घेतले. ऊत्तम शूज walking sticks ह्या होत्याच . मग निघालो.
जसजसे आत जाऊ तसतसा गारवा अन काळोख वाढत होता. जमिनीवर पाणी वहात होते.
आत चित्रविचित्र आकार तयार झालेत लाईमस्टोन चे . खूप thrilling अनुभव होता. आठेक किमी जाऊन परत आलो. एकूण गुहा 24 किमी लांब आहे. जाणारे जातात पण. आत जाताना कोरडा खाऊ पाणी ORS जरूर घेऊन जाणे
बाहेर येऊन थोडेफार खाल्ले अन थेट Shillong .. दमून गेल्याने हाॅटेल मधेच थोडेफार खाल्ले अन झोपलो.
दुसर्या दिवशी Riwai living roots bridge, Mawlynnnong village आणी dwaki -Umngot River boating..हे तेच आहे जिथे पाणी काचे सारखे नितळ आहे. खालचे दगडगोटे स्पष्ट दिसतात.
नदी पात्रात केवळ दहा पावलांवर बांगलादेश सीमा आहे.
आपली चौकी अन त्यांची चौकी समोरच आहेत.
त्यातल्या त्यात आपली चौकी ऊंचावर आहे पर्यायाने तिरंगा पण ..ते बघून ऊगाचच अभिमान वाटला.
शिलाॅग ला परत आलो. पोलिस बझार मधे handicraft emporium आहेत तिथून दोघांच्या टीम्स साठी मॅग्नेट घेतले. लाऊंज साठी हॅपी अवर्स होते तिथे जाऊन बसलो. Live Music सुरू होतं पण फारशी न ऐकलेली गाणी होती तर आलो परत.
दुसर्या दिवशी ऊठून रमत गमत आवरून चेक आऊट करून गुवाहाटी.
दोन दिवस तिथे फिरलो ...ऊमानंद मंदिर, कामाख्य मंदिर, त्याच आधारात असलेली बाकी मंदिर पण बघितली.गुवाहाटी रोप वे केला...ब्रम्हपुत्रा नजारा काही औरच दिसतो वरून. असम स्टेट म्युझियम छान आहे.
परी ला कामरूप आणी प्रागजोषिशपुर नावे वाचून प्रश्ण पडलेले मग कृष्ण नरकासुर अशी सगळी गोष्ट सांगितली.मैत्रीण आहे तिथे तिच्या घरी जाऊन आलो.
परी ला मेखला साडोर घेतली.
पुढचा आणी शेवटचा टप्पा होता काझिरंगा. बोर्गोस रेसाॅर्ट ला ऊतरलो. अंधार लौकर झालेला अन अमावस्या जवळ होती तर खूप वर्षांनी तार्यांनी भरलेले आकाश दिसले. काजवे बघितले. नंतर सकाळीच सफारी होती. Its total waste of time as per my opinion.
तिथून निघालो .. परतीचे विमान पकडले आणी घरी आलो.
पुर्ण प्रवासात जाणवलेल्या गोष्टी. स्वच्छता.. लोक शिस्तीत कचरा पेटीत टाकत होते. प्रत्येक धबधब्याच्या ठिकाणी नीट व्यवस्थीत पायर्या आणी मजबूत रेलिंग आहेत. दहा रूपये देऊन कोरड्या स्वच्छ बाथरूम्स प्रत्येक ठिकाणी आहेत. कितीही छोटी जागा असली तरी.
कमीत कमी हाॅर्न वाजवणे आणी जाम असताना लेन मधेच थांबून राहणे.
1.फेसबुक वर ट्रिपर्स ग्रुप आहे. तिथे थोडी माहिती शोधलेली.
2. Meghalay tourism website.
3. Bruised passport blog.
हे तीन ठळक रेफरन्स.
हाॅटेल ची यादी
1. The Heritage home stay
2. Marriott Bonvoy
3. Vivanta by Taj
4. Borgos at Kaziranga.
Restaurants explored
1. Di9
2. NI4
3. City Hut Dhaba
4. Olive Garden in Guwahati.
रोख रक्कम जरून बरोबर ठेवावी कारण entry point आणी वाॅशरूम्स ईथे रोख पैसे द्यायला सोपे पडते.
आत छोट्या गावात दुपारच्या जेवणात पोर्क मटण चिकन फिश आणी व्हेज थाळी हे ऑप्शन असतात. फ्राईड राईस सर्वव्यापी आहे.
पोर्क आणी बीफ हे मेघालय ईथे आहारात प्रचलित आहे. ज्यांना हे आवडत चालत नाही त्यांनी नीट चौकशी करून खायला जावे हे ऊत्तम.
सकाळी लौकर चहा नाश्ता करायची सवय असेल तर चेन हाॅटेल निवडलेली बरी कारण छोटी चहा नाश्त्याची दुकाने सकाळी नऊ नंतरच ऊघडतात.
धबधबे बघायला जाताना जास्तीचे कपडे आणी swim suit अवश्य बरोबर न्या. शांत थंड पाण्यात तरंगायची मजाच वेगळी.
