धुरंधर! … मेरा हौसला भी अय्याश है …

dhurandhar-trailer.jpg
ना तो कारवाँ की तलाश है,
ना तो हमसफर की तलाश है..

परवा मुव्ही पाहिल्या क्षणापासून ह्या ओळी डोक्यात घुमतायेत. नुसतं गाणंच नाही तर आख्खा धुरंधर डोक्यातून जातच नाहीये..

मला जनरली अ‍ॅक्शन मुव्हीज आवडत नाहीत. आय मिन व्हायोलंसच सहन होत नाही, म्हणूनच मी इच्छा असूनही गॉट पाहू शकले नव्हते. (आता पाहीन कदाचित..) पण धुरंधर आला आणि आठवडाभर दुसरं काही दिसतच नव्हतं सोमिवर. इतक्या पोस्टी, इतके रिव्ह्युज, इतकी आनंदी लोकं! आणि त्यातून रणवीर.. मग शेवटी गेलेच पाहायला..

(आणि काय मजा! समोर डिजे! इतकं मस्त वाटलं दीपांजलीला व तिच्या मैत्रिणींना अचानक भेटून! :) )

एनीवे.. तर मुव्ही सुरू झाला आणि गळे चिरणे, रक्ताचे पाट सगळं समोर यायला लागले.. आणि चिंता वाटू लागली, असे ३.३५ तास काढायचे?! जमेल का आपल्याला? पण काही विचार करायच्या आतच स्टोरीने वेढून घेतले आणि हळूहळू व्हायोलंस/goreचा विचार करणे निघून गेले. नुसते जे घडतेय ते डोळे विस्फारून बघणे एव्हढेच माझे काम उरले..

आत्ताशी आठवडाच झालाय, त्यामुळे मी काहीच स्टोरीबाबत लिहीणार नाही. तुम्ही सगळे उठा व जा मुव्ही पाहायला, प्लीज! धिस इज अ‍ॅब्सोल्युट सिनेमा!

रणवीरचा हा मुव्ही चालावा असं अगदी मनापासून वाटत होते मला. गेले काही वर्षं त्याला बिकट गेली. तो संपला वगैरेही हूल नेपो जनता आणि त्यांचा डॅडी पसरवत होती. खरंतर ८३ सुंदर मुव्ही आहे, पण बहुदा कोविडमुळे चालला नाही.. रॉकी रानी चालला पण त्याचे क्रेडीट सगळे अलियाला गेले. सो फायनली हा मुव्ही इतका सुंदर चालतोय, आणि कलेक्शन वगैरे जाऊद्या.. माउथ पब्लिसिटी की काय ती! असा मुव्ही चालायला पाहिजे.. ते प्रमोशन इव्हेंट्स, कपिल शर्माच्या शो वर जाऊन बडबड, इंटर्व्ह्यूज.. ह्या.. त्यात काही अर्थ नाही. प्युअर माउथ पब्लिसिटी.. गंमत म्हणजे, ट्रेलर पाहून केवळ मारधाड मुव्ही असेल, मसाला मुव्ही असेल असे वाटते, पण किती अफलातून मुव्ही केलाय आदित्य धरने! ह्या मुव्हीने काय वेगळे केलंय त्याची लिस्टच करूया..
१) वर लिहीले तसे नो प्रोमो, ओन्ली माउथ पब्लिसिटी..
२) मुव्ही पुस्तकासारखा उलगडतो.. विविध चॅप्टर्स. सो बर्‍याचदा चांगला मुव्ही वाईट एडीटींगने गाळात जातो तसं व्हायची शक्यता ऑल्मोस्ट ०. इट्स अ रिफ्रेशिंग टेक!
३) स्पाय मुव्ही आहे, हो खरंच, पण तरीही... हिरोने इतके subdued असणे हे इतके परीणामकारक ठरले. सगळीकडे अक्षय खन्नाचा बोलबाला होतोय ह्यावरूनच कळावे.
४) हिरो नेहेमी लार्जर दॅन लाईफ नसतो. इन्फॅक्ट ह्या मुव्हीत सुरवातीलाच हिरोला SA ला सामोरे जावे लागले आहे. नटरंग वगळता इतर कुठेही असे पाहिल्याचे आठवत नाही.
५) रेट्रो गाण्यांचा अतिशय परीणामकारक वापर! स्पॉईलर न फोडता लिहीणे अवघडे राव, पण लग्नातली मारामारी, बाईक चेझ, एस्पी चौधरीची एंट्री टू नेम अ फ्यु..
६) केवळ कथेच्या व अ‍ॅक्टींगच्या जोरावर ३.५ (+३.५?) असा ६-७ तासांचा कंटेंट सादर करण्याचा घाट घालण्याबाबत प्रोड्युसर लोकांनी दाखवलेला विश्वास व डिरेक्टरचा आत्मविश्वास. काय कमाल आहे.. हे करायला गट्स हवेत!

रणवीर - मी लिहीणार होते त्याने समरसून काम केले आहे. पण त्यात वेगळं? तो लिटरली नेहेमीच करतो. आउटसाईड वर्ल्ड मध्ये इतका इम्पल्सिव्ह व आउटगोईंग पर्सनालिटी असणारा रणवीर, ह्या मुव्हीत इतका burly, buffed, rugged, subdued दिसलाय. त्याचे हिरवेकंच डोळे पाहून एकदम चमकायला झाले होते, पण बलोच म्हणून अगदी सूट झाले आहेत. (आणि काय सुंदर केस! त्याने त्याचे हेअर केअर रुटीन पब्लिश केले पाहिजे Wink ) अगदी शांतपणे पण खाल्लाय मुव्ही ह्याने.
अक्षय खन्ना - हा ही माणूस काय चीझ आहे देव जाणे. वर्षाच्या सुरवातीला औरंगझेबाच्या रुपात पाहून घाबरले आणि वर्षाखेरीस रहमान डकैतच्या रुपात. व्हिलन, डाकू हा कायम खुनशी, आडदांड पाहाय्ची सवय आपल्याला.. हा इकडे किरकोळ शरीरयष्टीचा डकैत नाव असणारा इसम व्हिलनिश आहे खरा पण वाटत नाही असं वाटत असताना येतो बाबू डकैतचा तो सीन.. आणि मी डोळे झाकून बसले. त्यानंतर रक्ताचे पाट न वाहता दाखवले केवळ रहमान डकैतच्या कुर्त्यावर बारीक लाल ठिपके.. शहारा येतो ते पाहून. अगदी सुरवातीला सॅड सीनमध्ये अक्षय खन्नाच्या हात व चेहर्‍याचा मसल अन मसल थरथरलाय ते केवळ कमाल आहे! (नवरा तर म्हणाला, काहीतरी औषध घेतले असेल असे कसे शक्यय? :ड )
अर्जुन रामपाल - बाबो.. हा समोर आला ना तर मी घाबरून पळीन किंवा ह्याला कानाखाली तरी मारीन. काय काम केलेय ह्याने. अक्षरशः तळतळाट होतो याला पाहून. ते सगळे जमून टीव्हीवर न्युज पाहात असतात त्यात सीनला मी लिटरली धुसफुसले.. ह्याला तितके क्रेडीट मिळत नाहीये असं मला वाटतं.. पण इतके खुनशी काम करणे म्हणजे अवघडे बाबा..
संजय दत्त - ह्याने काही अ‍ॅक्टींग केली असेल असं वाटत नाही, पण तरीही हा अजिबात संजूबाबा वाटत नाही. जे वाचलेय त्यावरून त्याने एसपी चौधरीचे मॅनरिझम ह्याने अगदी पर्फेक्ट कॅच केले आहेत.
माधवन - अजित डोवलवर आधारित व्यक्तिरेखा माधवनने उत्तम वठवली आहे.. पण एक गोष्ट मात्र मला खटकली ती म्हणजे माधवनच्या तोंडी बर्‍यापैकी प्रपोगांडा सदृश वाक्यं. हे सरकार काही करत नाही, पण एक दिवस असा येईल जेव्हा सगळं बदलून टाकणारं सरकार येईल वगैरे. इट्स जस्ट मी प्रॉबेबली, पण मला माझी करमणूक पोलिटीकल अजेंडाशिवाय असलेली आवडते. असो..

मुव्हीतले बॅकग्राउंड म्युझिक मला आवडले, रेट्रो गाणीही आवडली.. पण सगळ्यात जास्त रुतले ते इष्क जलाकर. काय गाणे आहे माय गुडनेस.. अ‍ॅपरंटली हे जुने गाणे आहे मन्नाडे/रफींचे. ती जुनी कव्वाली इज नॉट माय टेस्ट, पण हे नवे मला फार फार आवडले. मी लिटरली लुपवर ऐकतेय. हे एकदा रिलिज झाले होते काही आठवड्यापूर्वी. पण त्यातला जो बेस आहे, तो Queen बँडच्या Another one bites the dust ची खूपच कॉपी होती, मग बहुदा लोकांनी तसे लिहील्याने की काय, त्यांनी तो बेस किंचित बदलला व गाणं रिलिज केले. मला दोन्हीही व्हर्जन्स खूप आवडली. पण ऑफिशियल अल्बम मध्ये हे आहे, मी रोज ऐकतेय. मला सांगता येत नाहीये मला नक्की काय आवडले.. वेल, रिदम्/बीट्स ह्याकडे माझे प्रथम लक्ष जाते तेव्हा ते तर नक्कीच आवडले आहेत. पण त्या ओळी, ती चाल, सिंगर्स लोकांचे रॉ आवाज, मधूनच लांबून उच्च पटीत येणारे दिल है टूटा.. तलाश शब्दावरची थरथर.. हौसला भी अय्याश है.. आधी बातें आँखे कहे, बाकी आधी खामोशी कह दे (आणि त्यावेळेस कदाचित बीफ खावं लागणारा, मूकपणे रडणारा हमझा.. ).. मी प्रेमात पडले आहे ह्या गाण्याच्या. _/\_

गेहरा हुआ पण मला ऐकायला आवडतेय. पण किंचित प्रमाणात अरिजितच्या हेलांचा कंटाळा आल्याने मला नको वाटते. म्युझिक सुंदर आहे पण. ह्यांची जोडी खूप जणांना खटकली, पण मला का कोणास ठाऊक नाही खटकली. एक कमेंट वाचली - हे दोघं म्हणजे ब्युटी & द बीस्ट - एकदम पटले.

दिलजितचे तेरे नि काररन - हे पण खूप आवडतेय.

एक लिहायचे राहिले होते ते म्हणजे कॉश्च्युम व मेकप डिपार्टमेंटने अगदी अफलातून काम केले आहे.. ओरिजिनल लोकं व मुव्हीतली लोकं यांची कम्पॅरिझन बघा-

img_1236.jpeg

मी तुम्हाला सांगितले का, मला मुव्ही खूप आवडला? :) नक्की पाहा! आणि दुसरा भाग १९ मार्चला येतोय. तो ही पाहा!

वर
0 users have voted.