तर... पहले मुझे मेथी की भाजी बिलकुल पसंद नहीं थी. मेथी सुनकर ही मैं भाग जाती थी!
फिर एक दिन मेरी बेस्टी ने उसके घर में बनने वाली मेथी खिलाई और.. मैं फॅन बन गई :) मैत्रीण श्रीरामपूरची असल्याने मी तिथली म्हणते, पण नगर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे अशी भाजी करतात.
तर ही साधी, गावरान मेथीची भाजी शेतावर भाकरी केलेल्या तव्यातच शक्यतो पटकन केली जाते. खुपजणी करतही असतील, मी हॉस्टेलला मैत्रिणीने केल्यापासून नेहमी करते.
साहित्य:
मेथीची जुडी निवडून फक्त पानं (चिरायची नाही)
लसूण पाकळ्या - दहा बारा
हिरवी मिरची - दोन
कांदा - एक बारीक चिरलेला (भाजी वाढवण्यासाठी, नाही घातला तर उत्तम)
दाण्याचं कूट - बचकभर
तेल दोन चमचे
हिंग, हळद, जिरे (हिंग, हळद नाही घातले तरी चालेल)
कृती:
१. लोखंडी कढईत तेल गरम करून, जिऱ्या, हिंगाची फोडणी करून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या, चिरलेल्या मिरच्या आणि कांदा परतून घ्यायचा. तो थोडा मऊ झाला की त्यात हळद घालायची आणि ढवळून घ्यायचं.

२. आता मेथीची पाने अख्खीच त्यात घालून नीट मिसळून घ्यायची. ढवळत रहायचं मेथी थोडी मऊ पडली की वर ताट झाकण ठेऊन त्यात पाणी घालायचं.
३. पाच मिनिटांनी मेथी शिजली की त्यात चवीनुसार मीठ आणि भरपूर दाण्याचं कूट घालून ढवळायचं. भाजीत पाणी अजिबात घालायचं नाही. झाकणात पाणी घालूनच शिजवायची आहे.
४. अजून पाच मिनिटांनी पूर्ण शिजली की लगेच भाकरीबरोबर किंवा भाकरी नसेलच तर पोळीबरोबर घेऊन चट्टामट्टा करायचा.
लोखंडी कढईत केली तर सूपर से ऊपर!

