परतीचा प्रवास

परतीचा प्रवास
28 तारखेला घर सोडून हॉटेलमध्ये रहायला गेलो त्याला एक महिना झाला. त्या दिवसापासून बहारीन मध्ये धुवाधार missiles drones सुरू झाले. 28 ची रात्र आम्ही गादीवर बसुन काढली कारण दर तासाला एक बॉम्ब पडायचा. काचा हादरत होत्या. सतत sirens सुरू होते. त्या रात्री आम्ही पहिल्यांदा घाबरलो. असे वाटले जर आता सौदीच्या एअरपोर्टवर पण बॉम्ब पडले तर आपण जाऊ शकणार नाही. सकाळी याने बॉस ला फोन करून सुट्टी मागितली. इतर लोकांना मे मध्ये हजला जायचे आहे. त्यामुळे याला मे पहिल्या आठवडय़ात परत येण्याच्या बोलीवर सुट्टी मिळाली. अक्षरशः पुढच्या मिनिटात आम्ही तिकीट काढले. एका दिवसात निघाल्यामुळे,ताणामुळे, त्यात सतत न झोपल्यामुळे डोके चालत नव्हते. थोडे कपडे आणि रोजची औषधे फक्त घेतली. त्यातही 29 ला हा रात्री डय़ुटी वरुन आल्यावर आम्ही घरी सगळे आणायला गेलो तोच घराखाली black out झाला. धडाधड पोलिसांच्या गाड्या आल्या समोरच्या हॉटेल भोवती. बहुधा तिथे अमेरिकन नागरिक असावेत. त्यांना नेण्यासाठी. कारण जिथे ते असतात तिथे attacks होतात. लवकर एरिया बाहेर जायला सांगितले गेले. त्यामुळे फारसे न बघता बॅगा घेऊन हॉटेल वर आलो. दुसर्‍या दिवशी रात्री साडेदहाच्या विमानासाठी सकाळी 11 वाजता बोलावले होते. तिथे बस मध्ये बसवून दिले. तिथली gulf air ची मुलगी मला तुम्ही जा आम्हाला boom boom मध्ये सोडून तुमच्या देशात म्हणाली. तेव्हा फार वाईट वाटले. आपल्याला निदान आपल्या देशात जाण्याचा तरी पर्याय आहे.
बहारीन airspace बंद असल्यामुळे सध्या gulf air सौदी मधल्या दम्माम एअरपोर्टवरुन फ्लाइट नेतात. त्यासाठी सौदी व्हिसा आणि ट्रान्सपोर्ट ते arrange करतात. सौदी आणि बहारीन sea link ने जोडलेले आहेत. या बॉर्डर वर आमचे biometric आणि सामानाचे स्कॅनिंग झाले. तिथे दोन अडीच तास लागतात. नंतर dammam ला पोहोचल्यावर माझी सौदी मधली मैत्रीण अमृता आमच्यासाठी जेवण घेऊन आली. अक्षरशः दहा मिनिटाच्या भेटीसाठी ती आणि तिचा नवरा सुमेध तर डय़ुटी वरुन uniform पण न बदलता धावत पळत आले. तिने दिलेला दहीभात खाताना इतक्या दिवसात न आलेले पाणी आले डोळ्यात. कसले हे ऋणानुबंध असतात..
रात्री विमान वेळेत सुटले. पण सध्या ते इराणी airspace पासून लांबून जाते. त्यामुळे चार तास लागतात प्रवासाला. प्रचंड ताण येत होता. विमानाच्या मागे दोनदा वीज चमकली तर आम्हाला missile आले की काय वाटून धडधड. आम्ही येतो आहे कोणाला सांगितले नव्हते कारण विमान उडण्याची अनिश्चितता. कॅन्सल झालं तर म्हणुन उतरेपर्यंत कळवले नव्हते. एकदाचे सकाळी मुंबईत व्यवस्थित पोहोचलो आणि त्याच सौदीच्या भागात त्याच वेळी missile intercept झाले असे अमृताने कळवले !
आता येऊन दोन तीन दिवस झालेत आता आमच्या वर युद्धाचे काय परिणाम झाले आहेत समजते आहे. आम्हाला फटाके वाजले किंवा कोणत्याही मोठ्या आवाजाने धडधड होते. Siren सारखे आवाज येतात. रात्रभर उगाच अस्वस्थ्य वाटते. झोप येते लागत नाही. कोणाशी यावर बोलावेसे वाटत नाही. युद्धावरचे विनोद सहन होत नाहीत. 1 तारखेला कोणीतरी war lockdown असे काहीतरी एप्रिल फूल मेसेज पाठवले होते. एरवी इग्नोर केले असते. त्या व्यक्तीवर एकदम चिडायला झाले. शेवटी पुण्यातून निघून आज माझ्या लाडक्या कोल्हापूरला आलो. अंबाबाईला भेटलो. आता इथे जरा बरे वाटते आहे. कोणी ओळखत नाही, जज करून विचारत नाही. काही दिवस इथेच राहू. जरा शांत होऊन परत जाऊ. 3 मे पर्यंत हे संपावे सगळे. आम्हाला जावेच लागणार आहे. परत त्याच परिस्थितीत जावे लागण्याची कल्पना भयावह आहे. आजच तात्यांनी अजून दोन तीन आठवडे लढायची तयारी दाखवली आहे. आमचा छोटासा देश हे कसे sustain करेल त्यांचा आपला तात्यांचा देवच जाणे...
img-20260331-wa00011.jpg

वर
0 users have voted.