निसर्ग आपल्या भवतीचा

हल्लीच्या हल्ली फारच फोटो टाकणं झालं इथे. हे कळतंय तरी नवीन लेखनाचा बीबी उघडतेय.

नंदिनीच्या बीबीवर लिहिलं मी की आमच्या गच्चीत थोडीफार झाडं आहेत तशी आजूबाजूलाही आहेत त्यामुळे पक्षांचे आवाज वगैरे जरा येत असतात. कॅमेराही जरा वापरता रहावा म्हणून तेच ते पक्षी दिसले तरी कधी कधी कॅमेरा गच्चीत घेऊन जाते मी. गच्चीतल्या झाडांना जरा चांगली फुलं असली की त्यांचेही फोटो काढते. तेही आवडतं मला.

img_5542.jpeg

img_5870.jpeg

img_5997.jpeg

रेन लिली -
img_6770.jpeg

img_6771.jpeg

लिलीची व्हरायटी -
collage_export_12541346-35c4-45cd-996a-10f7fbcc27dd.jpeg

गच्चीत कढिपत्त्याच्या किंवा लिंबाच्या झाडावर अळी दिसली की नवरा ती घरी घेऊन येतो आणि साग्रसंगीत त्या फुलपाखराचं बाळंतपण घरीच करतो. फुलपाखरांच्या जीवनाचे चार टप्पे असतात. अंडी, अळी किंवा सुरवंट (Larva), कोष (Pupa) व फुलपाखरू. हे सगळे टप्पे साधारण महिन्याभराचे असतात म्हणजेच फुलपाखरू बाहेर यायला महिन्याभराचा वेळ लागतो. सुरवंट झाडावरच ठेवला तर पक्षी खाऊन टाकतात म्हणून त्यांना घरी आणून डब्यात वाढवतो. निदान त्यातून एक फुलपाखराचा जन्म होईल इतकाच उद्देश. ह्यावर कोणाचा आक्षेप येऊ शकतो. तर हे असं आधी बऱ्याचदा करून झालं आहे. फुलपाखरू जन्माला आलं की त्यांना सोडून द्यायचं.

काही फुलपाखरं अशीच घरी वाढवून सोडलेली तर काही झाडांवर आलेली -
collage_export_5571d465-074c-4a7c-9a46-1abd5fcc89b7.jpeg

दोन आठवड्यांपूर्वी अशीच एका टळटळीत सकाळी ही तीन फुलपाखरं मिळाली.

Mottled Emigrant
img_6772.jpeg

Lime Butterfly
img_6773.jpeg

Black Rajah
img_6774.jpeg

फायनली हे काल फोटो काढता आलेलं - Tailed Jay

img_6765.jpeg

img_6766.jpeg

काल ब्लिडींग हार्टच्या फुलांवर शिंजीर/जांभळ्या पुठ्ठ्याचा शिंजीर (Purple-rumped Sunbird) ही आला आणि फोटो काढायची संधी देऊन गेला.
img_6767.jpeg

वर
0 users have voted.