२८ फेब्रुवारी हा आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवशी बऱ्याच वैज्ञानिक संशोधन संस्था सर्वसामान्यांसाठी मुख्यत्वे शालेय विद्यार्थ्यासाठी खुल्या असतात. तिथे बरेच दिवसभराचे उपक्रम असतात.
मुंबईतल्या अश्या काही संस्था :
१. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र : http://www.hbcse.tifr.res.in/events/national-science-day-2016 ( मी इथे २-३ वर्ष गेले होते खूप मज्जा यायची मला तिथे )
२. BARC अणुशक्तीनगर
३. नेहरू विज्ञान केंद्र आणि तारांगण : दोन्हीकडे बरेच उपक्रम असतात. फोन करून माहिती विचारता येते.
पुणे
१. TIFR NCRA GMRT नारायणगाव Observatory २८-२९ असे दोन दिवस तिथे जाता येतं. मी खूप पूर्वी एकदा गेले होते त्यांच्या open day साठी : http://gmrt.ncra.tifr.res.in/~sciday/sciday/scienceday.htm
२. IUCAA (आयुका) : http://www.iucaa.ernet.in/~scipop/ScienceDay/
३. IISER ( आयसर पुणे ) : http://www.iiserpune.ac.in/events/Science+Day
बंगळूरू
१. IISc ( भारतीय विज्ञान संस्था, बंगळूरू) : ५ मार्च २०१६ http://www.iisc.ernet.in/events/openday2016.php ( दरवर्षी मार्च महिन्यातला पहिला शनिवार सकाळी ९-६ )
ह्याशिवाय
जागतिक हवामान दिन : २३ मार्च ह्या दिवशी दरवर्षी भारतीय हवामान केंद्रांचा open day असतो. मुंबई- कुलाबा केंद्र नक्कीच उघडं असतं. इतर ठिकाणची ठोस माहिती नाही.