माझी भटकंती - ओहाय ( Ojai )

जुनाच लेख!

आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही!

तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही.. खरं म्हणजे हे जास्त करून माझ्या आठवणींचा शोध, स्मरण आणि त्या त्या ठीकाणाबाबत मला जी काही माहीती मिळेल ती मी संकलित करून ठेवत आहे.. (काही माहीती ही विकीच्या माहीतीवरून भाषांतरीत केलेलीही असेल..) वाचकांना कितपत आवडेल कल्पना नाही पण माझा स्वतःचा आनंद नक्कीच असेल त्यात...

मी इथे लॉस एंजिलीस मधे राहते. म्हणजे अर्थातच माझ्या भ्रमंती मधे डिस्नेलॅंड आलं, युनिव्हर्सल स्टुडीओज आलं, सॅन दिएगो मधलं सीवर्ल्ड आलं.. अजुन हजार ठीकाणं.. पण मी सुरवात तरी करतीय त्यामानाने माहीत नसलेल्या ठीकाणापासून. तिथे मी रिसेंटलीच जाऊन आले त्यामुळे थोड्या आठवणी ताज्या! आणि कितीही छान असल्या तरी त्याच त्याच फेमस जागांबद्दल मला आत्तातरी नाही लिहायचेय.. ते परत कधीतरी!


ओके तर ही जागा म्हणजे ओहाय.. ( Ojai -> Valley of Moon ) . हे गाव पुर्वी म्हणजे साधारण १८७४ नॉर्डहॉफ नावाने स्थापन झाले.. परंतू पहील्या महायुद्धाच्या सुमारास जर्मन वाटणारी नावं बदलायचा ट्रेंड आला, त्यात या ही गावाचे नाव चेंज झाले.. व ते ओहाय म्हणून प्रसिद्ध झाले..

1

या व्हॅलीचा शोध माझ्या नवर्‍याला असंच फिरताना लागला.. संध्याकाळी लॉंग ड्राईव्हला बाहेर पडला तो सांता बार्बराच्याही पुढे गेला.. आणि काय रस्ता आहे पाहू म्हणत डोंगरदर्‍यांतून , जंगलातून, या सुंदर व्हॅलीतून जात राहीला.. आणि हे रत्न सापडले.. मी आल्यावर आम्ही मागच्या वर्षी खूप वेळा जाऊन आलो.. दर वेळेला तिथली फ्रेश हवा वेड लावते..

खरं म्हणजे मला काय लिहावं कळत नाहीये आता.. काही गोष्टी किती शब्दातीत असतात? मला नेहेमी तिथे जाताना असं वाटतं काय सुंदर निसर्ग आहे हा.. यावर भरभरून लिहीले पाहीजे.. प्रत्यक्ष लिहायला बसले तर काही सुचेना झालेय राव.. काही फोटोज टाकते अधुन मधुन.. म्हणजे तुम्हीही निशब्द व्हाल! :)

3

पुर्णपणे घाटातली वाट.. वळणा वळणाची! दोन्ही बाजुंना पानांच्या ओझ्याने वाकलेली आणि कोण येतंय बरं घाटातून अशा उत्सुकतेने बघणारी झाडं.. अगदी कोणीतरी येऊन लावली आहेत सिस्टीमॅटीकली असं वाटतं.. अर्थात इतकी झाडं त्यामुळे भरपूर फ्रेश आणि गारेगार हवा.. गाडीतल्या एसीच्या तोंडात मारेल अशी! तो ऑक्सिजन छातीत भरून ठेवायची आम्हा दोघांना खोडच लागलीय..

4

भरपुर मनासारखे घाटात हिंडून , वर खाली चढ उतार करून झाले की चाहुल लागते पाण्याची!
अशा सुंदर ठीकाणी त्याहुन अत्युत्तम तलाव/लेक पाहीजेच! तिथे गाडी लावून त्या शांत पाण्यावर कधी उठल्याच तर लहरी आणि वार्‍याचा झाडा-जंगलातून जाणारा आवाज ऐकत थांबून राहायचे..

6

एखादीच नाव पाणी कापत संथपणे चाललेली...

7

8

अशा काही जागा असतात तिथे तुम्ही निशब्द होता.. लास व्हेगासला मानवाने निर्माण केलेले ते कर्तृत्व पाहून आपण अचंबित होतो.. तर इथे.. कोण निर्माता कोण जाणे.. त्या अनाम निर्मात्याची ही कलाकुसर.. निसर्ग!
आनंदाने वेड नाही लागलं तर तुम्ही एक नंबरचे अरसिक! :)

9

10

5

( तटी: यातले काही फोटोज मागच्या वर्षी मी ब्लॉगवर टाकले आहेत. लेख लिहायचा म्हणून
ते व नवीन काही फोटोज इथे डकवले आहेत.. )

अजुन एक माहीती विकीवर मिळाली ती अशी की, इथे पुर्व-पश्चिम अशा पर्वतरांगा असल्याने सूर्योदयाच्यावेळी जगात काहीच गावांमधे दिसणारी "पिंक मोमेंट" दिसते.. विकीमधे म्हणतात..

"The fading sunlight creates a brilliant shade of pink on the Topatopa Bluffs that stand at the east end of the Ojai Valley, reaching over 6,000 feet (1,800 m) above sea level. Nordhoff Ridge, the western extension of the Topatopa Mountains, towers over the north side of the town and valley at more than 5,000 feet (1,500 m). Sulphur Mountain creates the southern ranges bounding the Ojai Valley, a little under 3,000 feet (910 m) in elevation."

( फोटो आंतरजालावरून साभार.. http://www.flickr.com/photos/gamma-infinity/540215547/)

शिवाय एक इंटरेस्टींग माहीती ओहायच्या संदर्भात.. लॅरी हॅगमॅन(आय ड्रीम ऑफ जिनी मधला नेल्सन) , जॉनी डेप आणि जे. कृष्णमूर्ती ( फिलॉसॉफर ) हे ओहायचे रहिवासी आहेत/होते.. विशेषत: जे कृष्णमूर्तींचे बरेच वास्तव्य इथे होते, आणि त्यांनी इथे बरेच काम केले आहे... :)

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle