केल स्मूदी!
आत्ताच केल स्मूदी केली. आणि मग ही पोस्ट बघितली. तडक जाऊन त्या स्मूदीचा फोटो काढला. मग परत जिन्नस गोळा केले फोटो काढायला. आता त्या जिन्नसांची उद्या परत करेन स्मूदी!
तर केल हा हिरवा पालापाचोळा घालून केलेलं स्मूदी हे पेय
साहित्य :
केल (kale) -
बदाम (३-४ तास पाण्यात भिजवून)
सब्जा (३-४ तास पाण्यात भिजवून)
कुठलही फळ ( मी बरेचदा केळं घालते. आज सफरचंद होतं ते घातलं.)
ऑरेंज ज्युस अथवा नारळाचे पाणी अथवा योगर्ट अथवा प्रोटीन शेक
हवं असल्यास चवीला आलं
कृती:
सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडर मधून फिरवा. पौष्टिक स्मूदी तयार.
मार्कं - मार्कं...स्वतः मार्कं द्यायची पद्धत फारच आवडली. असं असतं आमच्या वेळी तर! daydreaming
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क.
३. फोटो दिलाय - १ मार्क
आता ही कसली पारंपारिक रेशिपी? ट्विस्ट म्हणूया का? (तेवढाच एक मार्क जास्त). नवर्याने केली तर तो हाती येईल ते ढकलतो यात. एकदा मी बाजूला चॉकलेट चिप्स पॅनकेक्स बनवत होते तर त्याने स्मूदीत थोड्या चॉकलेट चिप्स ढकलल्या.
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क
५. कॅलरी तक्ता - जाऊ देत बुवा. एवढे मार्क खूप झाले. नापास तर नाही ना?