स्मूदी सगळेच करणार, पालक पण सगळेच वापरणार म्हणून जरा हटके जॅपनीज मस्टर्ड स्पिनॅच चे हे सूप. जॅपनीज मस्टर्ड स्पिनॅच चे मूळ नाव कोमात्सुना. मी तोक्यो मधे रहाते तो भाग हा कोमात्सुना साठी प्रसिद्ध आहे. इतका की दर वर्षी इथे कोमात्सुना फन रन होते. फिनिशर ला २ ताज्या ताज्या कोमात्सुनाच्या जुड्या मिळतात. सो हेल्दी! १०-२० किमी पळून आल्यावर अर्थात हे सूप नाही तर कोमात्सुना स्मुदी आवडेल पण अजून विंटर अणि स्प्रिंग असे तळ्यात मळ्यात असलेले वेदर असल्याने आज सूपच! नमनाला धडाभर असले तरी सूप मधे मुळीच तेल नाहीये.
साहित्यः
१ कोमात्सुना ची जुडी (पालक पण चालेल. ताजा/फ्रोजन कसलाही)
१ टेस्पू. मूगडाळ
इतक्कुस्सं आलं
१ छोटा कांदा बारीक चिरून
२-३ लेमनग्रास च्या काड्या
१ टीस्पून तूप
मीठ, मीरपूड चवीप्रमाणे
कृती
बेबी कूकर मधे तूप गरम करून कांदा परतून घ्यावा. फार ब्राऊन नाही करायचा. त्यावर आल्याचे तुकडे घालून अगदी थोडे परतावे.
त्यातच धुतलेली मुगाची डाळ घालून हलके परतावे.
२ कप गरम पाणी घालून मूगडाळ शिजेपर्यन्त शिजवून घ्यावे.
कूकरचे झाकण उघडून त्यात चिरलेला कोमात्सुना आणि लेमन्ग्रास घालावे.
कोमात्सुना थोडा विल्ट झाला की गॅस बंद करून मिश्रण थंड होउन द्यावे.
हँड ब्लेंडर अथवा मिक्सर मधून काढून सूप परत थोडे गरम करावे.
आवडीप्रमाणे मीठ, मिरपूड आणि हवे असल्यास थोडे फ्रेश क्रीम घालून गरम गरम प्यायला घ्यावे.
बरोबर कार्ब्स हवे(च) असतील तर सूप स्टीक्स, हार्ड क्रस्ट ब्रेड, क्रूटॉन्स, गार्लिक ब्रेड घेतले तरी छान लागते.
मार्क्सः
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क.
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक पालक सूपच्या रेसिपीला कोमात्सुना चा ट्विस्ट - २ मार्क
५. कॅलरी तक्ता - हे जरा नंतर बघते.
Share this
Keywords:
सृजनाच्या वाटा:
ImageUpload:

