अव्हाकाडो म्हणजे "गुड फॅट", ते बॅड कोलेस्टेरॉल कमी करतं इ. इ. त्यामुळे तो अधूनमधून खावा म्हणे. मला आवडतो म्हणून मग नुसता, किंवा अव्हाकाडो-बनाना चाट, ग्वाकामोले अस, काहीबाही बनवून पोटात जातो. त्याची दूध, योगर्ट घालून स्मूदी करतात पण मला त्यात दूध आवडले नाही. म्हणून ही आपली स्पायसी लस्सी - "मोहिता".
साहित्य-
अर्धी वाटी avocado pulp. एक मध्यम आकाराचा अर्धा घेतला तरी चालेल.
१ कप लो फॅट ताक,
१ कप पाणी
jalapeno किंवा तिखट हिरव्या मिरचीचा इंचभर तुकडा
मूठभर कोथिंबीर
चवीला मीठ, साखर
१/२ चमचा चाट मसाला
कृती-
avocado pulp, ताक, पाणी, कोथिंबीर, मिरची, मीठ, साखर सगळं ब्लेन्डरमध्ये घालून स्मूथ ब्लेन्ड करुन घ्यायचं. avocado ने खूप थिकनेस येतो, तेव्हा जरूर पडल्यास थोडे ताक किंवा पाणी घालून पुन्हा ब्लेन्ड करावे.
ग्लासमध्ये ओतून सर्व करताना वरुन चाट मसाला भुरभुरावा. कोथिंबीर आणि मिरची सजावटीसाठी वापरु शकता.
याला सुंदर मोहक हिरवा रंग येतो. म्हणून याचं नाव "मोहक हिरवे ताक" - मोहिता. :winking:
कॅलरी तक्ता-
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क.
टोटल - ८
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle