किकाकोली अर्थात किवी, काकडी, ब्रोकोली स्मूदी
उपक्रमाच्या नियमानुसार हिरव्या रंगाची भाजी किंवा फळ असणे आवश्यक. या रेसिपीत मी किवी हे फळ ज्याचा गर हिरव्या रंगाचा आहे आणि ब्रोकोली ही हिरवी भाजी हे दोन मुख्य घटक पदार्थ वापरले आहेत.
ही पारंपारीक रेसिपी नाही. कारण किवी हे फळ आणि ब्रोकोली ही भाजी आपल्या देशात अगदी काही वर्षांपूर्वीच मिळू लागली आहे. हं, पाश्चात्यांची पारंपारीक रेसिपी असू शकेल, त्याबद्दल मला माहीत नाही. मग ही पा. कॄ. काय माझ्या डोक्यातून उगम पावली आहे का? तर याचे उत्तरही नाही असेच आहे. 'किवी डिलाईट' या नावे एक पेय आमच्या ऑफिसच्या फूडकोर्टात मिळते. किवी, काकडी, केळ्याचा गर, वेगवेगळे इसेंस, सुका मेवा आणि आईसक्रीम यांचे मिश्रण असलेला आंबट गोड पेयाचा भला थोरला ग्लास असे त्याचे स्वरुप असते.
एके ठिकाणी हे पेय जेवणाला पर्याय म्हणून घेतले जाताना पाहिले. मात्र 'वन डीश मिल' म्हणून हे थोडे हेल्दी वर्जन होते. त्यात कच्ची ब्रोकोली घातली होती. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेले हे पेय, त्याला मी दिलेले थोडे वेगळे रुप म्हणजे ही किकाकोली स्मूदी.
यासाठी मी घेतलेले साहित्य व प्रमाण असे -
१. किवी २ नग, साले काढून फक्त गर
२. ब्रोकोलीची भाजी - ३ ते ४ तुरे , ४ ते ५ पुदीन्याच्या पानांबरोबर वाफवून.
(मूळ पा. कॄ. त असलेला उग्र वासाचा कच्चा ब्रोकोली तसाच वापरणे हे माझ्या पाककलेच्या तत्वांत काही बसेना, म्हणून तो पुदीन्यासह वाफवून घेतला).
३. काकडी - १ लहान, साले काढून, तुकडे करुन
४. केळे - १ (वेलची केळे नाही), स्मॅश करुन
५. पुदीना पाने - ५ ते ६
६. मध - १ टेबलस्पून
७. वेलची पावडर - चिमूटभर
कॄती-
हे सारे मिश्रण ब्लेंडरमधून फिरवून स्मूथ करुन घेतले. गरज वाटल्यास थोडे दूध फिरवताना घालू शकतो. मी घातले नाही.
फ्रीजमध्ये थोदा वेळ थंड करत ठेवले व ग्लासमध्ये ओतून सर्व केले.
किवीचा आंबटपणा व केळे आणि मधाचा गोडवा यामुळे आंबट गोड अशी चव येते या स्मूडीला आणि अगदी पोटभरीचेही आहे.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - हो १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - हिरवा २ मार्क, .
३. फोटो दिलाय - हो १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क,
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क.
6 Ingredients Edit Recipe
100 grams, Kiwi (Peeled)
1 fluid ounce, Steamed
1 small (6-3/8" long), Cucumber, peeled, raw
1 container (0.5 oz ea.), Peeled
1 tbsp, Local Honey
1 g, Fresh Mint Leaves
Nutrition Facts
Servings 2.0
Amount Per Serving
calories 83
% Daily Value *
Total Fat 1 g 1 %
Saturated Fat 0 g 0 %
Monounsaturated Fat 0 g
Polyunsaturated Fat 0 g
Trans Fat 0 g
Cholesterol 0 mg 0 %
Sodium 5 mg 0 %
Potassium 330 mg 9 %
Total Carbohydrate 20 g 7 %
Dietary Fiber 3 g 12 %
Sugars 15 g
Protein 1 g 3 %
Vitamin A 6 %
Vitamin C 94 %
Calcium 3 %
Iron 3 %
* The Percent Daily Values ar
टोटल - ८ मार्क्स