हा आहे माझ्या आवडत्या डॉक्युमेंटरी(फॅट, सिक & निअर्ली डेड) मधला ज्युस. 'मीन ग्रीन ज्युस'
साहित्यः
४ सेलेरी स्टिक्स
२ ग्रीन अॅपल
एक काकडी
मुठभर पालक
मुठभर केल
१ लिंबू
आल्याचा बोटभर तुकडा
कृती:
मी ब्रेव्हिलचा ज्युसर वापरला आहे. त्यामुळे कृती अॅज सच काहीच नाही. सर्व भाज्या छान स्वच्छ धूवून घेतल्या. अन टाकल्या ज्युसरमध्ये. तो ग्लासमध्ये ओतला अन प्यायला! :) चविष्ट प्रकरण होते आले व लिंबामुळे! अॅपल व काकडीमुळे सर्व आंबटपणा बॅलन्सही होतो.
फॅट, सिक & निअर्ली डेड मधील हा ज्युस(त्याची ओरिजिनल लिंक ) - डिटॉक्सिफिकेशन व ओव्हरॉल सिस्टीम क्लिअर करण्यासाठी अतिशय चांगला आहे! ह्यात व्हेरिएशन म्हणुन पार्सली किंवा कोथिंबीरही घालता येईल.
हा त्या वरच्या वेबसाईटवरचा तक्ता :
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक रेसिपी - १ मार्क (पारंपरिक नाहीये पण जशीच्या तशी रेसिपी वापरली आहे म्हणून १ मार्क घेते)
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क.
६. कृत्रिम रंगाचा उपयोग-
८. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले नाही -
९. सांगितलं एक आणि केलं भलतंच -