आज मैत्रिण वर रनर्स क्लब वर लिहायला आले आणी हि घोषणा पाहिली...
मावशींना गाजराची कोशिंबीर करायला सांगितले होतेच त्यालाच थोडा ट्विस्ट दिला , तेवढाच मार्क नको जायला :winking: :ड
साहित्य
१.५ वाटी गाजराचा किस,
१.५ स्पु ओटस ची पावडर
मोहरी , लाल मिरची
दही , साखर मीठ
कृती
१. दही फेटून त्यात ओटस ची पावडर घातली , ते मिक्स करुन मग गाजराचा किस , मीठ साखर घालून परत मिक्स केले
तेल न घालता मोहरी आणी मिरची नुसतीच परतून घेतली आणी वरुन घातली ..
दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क -- ओरिजिनल म्हणजे काय? कसे ओळखाय्चे?
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क
सगळे मिळून - ८ मार्क