रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- पिझ्झा सॉस
Submitted by uju on Sat, 03/26/2016 - 18:16
रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- पिझ्झा सॉस
ईट युअर कलर्स - रंग लाल
पिझ्झा सॉस
साहित्य
टॉमॅटो - ४-५
कांदा - अर्धा- बारीक चिरून
लाल कॅप्सिकम - पाव - बारीक चिरून
हिरवी सिमला मिरची - पाव - बारीक चिरून
लसूण पाकळ्या - ८ ते १० - बारीक चिरून
लाल मिरची पेस्ट - २ चमचे (लाल सुक्या मिरच्या पाण्यात भिजत घालून अर्ध्या तासाने थोड्या पाण्यात मिक्सरवर केलेली पेस्ट)
ओरेगॅनो - १ चमचा
मीठ, साखर, काळी मिरी पूड - चवीनुसार
ऑलिव्ह ऑईल - १ चमचा
कॄती -
टोमॅटो उकळत्या पाण्यात १ मिनीटभर ठेवून ब्लान्च करून घ्यावे. नंतर त्यांची सालं काढून ते बारीक चिरून घ्यावेत. पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. त्यावर दोन्ही सिमला मिरच्या परतून मग कांदा परतून घ्यावा.
कांदा चांगला परतला गेला की टोमॅटो टाकून २ मिनीट परतावे.
मग त्यात लाल मिरची पेस्ट , मीठ, साखर टाकून बारीक गॅसवर पाच मिनीट परतून घ्यावे. सॉसची कन्सिसटन्सी आली/ हवा तितका दाटपणा आला की गॅस घालवून त्यात काळी मिरी पूड आणि ओरेगॅनो घाला.
पिझ्झा सॉस रेडी.
पिझ्झा बेसवर/ ब्रेड्वर/ हलक्ञा भाजलेल्या पोळीवर/ ब्रेडवर हा सॉस स्प्रेड करून हवे ते टॉपिंग्ज वापरून पिझ्झा बनवा किंवा चपाती वर पसरवून चीज भुरभुरवून मटकवा.
नेटवर शोधलेली रेसिपी.
मी केलेले अॅडीशन--
टोमॅटो प्यूरी किंवा चिरलेले टोमॅटो न वापरता ब्लान्च टोमॅटो साल काढून चिरून वापरले.
लाल अन हिरवी सिमला मिरची अॅड केली.
केचप अॅड करायला सांगितलेले त्याचा वापर केला नाही.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - हो १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - लाल रंग आहे २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - पारंपारीक आहे की नाही माहिती नाही पण मी वाचलेल्या रेसिपीला ट्विस्ट दिला - २ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - जान दो, ईत्ता हम नही करेंगा जी :वैतागः
६. कृत्रिम रंगाचा उपयोग- :हेबरंनव्हे:
८. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले नाही -:हेबरंनव्हे:
९. सांगितलं एक आणि केलं भलतंच - :हेबरंनव्हे:
१०. रेसिपीचे मार्क्स स्वतःच कॅलक्युलेट करुन लिहायचे - ते काम तुमच्याकड लागल बघा biggrin